पीवायसी रिबाऊंड रॅकेट लीग २०२० स्पर्धेत किर्रपन्स संघाचा सलग दुसरा विजय

पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित अनोख्या व नाविन्यपूर्ण अशा पीवायसी रिबाऊंड रॅकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत किर्रपन्स संघाने मस्कीटियर्स संघाचा 14-09असा पराभव करून सलग दुसरा विजय नोंदविला.

पीवायसी हिंदू जिमखानाच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात किर्रपन्स संघाने मस्कीटियर्स संघाचा 14-09असा पराभव केला. बॅडमिंटन प्रकारात किर्रपन्स संघाला मस्कीटीयर्स संघाकडून 3-5 असा पराभव पत्करावा लागला. पण त्यांनंतर टेबल टेनिस मध्ये कुणाल भुरोत, श्रीदत्त शानबाग, संग्राम पाटील, मकरंद चितळे, संतोष भिडे,अजय जाधव, अभय जमेनिस, रोहन जमेनिस, अभिजित मुनोत, अमित धर्मा, शमीका एरंडे, सुविद नाडकर्णी यांनी केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर किर्रपन्स संघाने मस्कीटियर्सचा 6-2 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. टेनिसमध्ये किर्रपन्स संघाने मस्कीटियर्सचा 5-2 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.

दुसऱ्या सामन्यात लॅन्सर्स संघाने सामुराईज संघाचा 13-10 असा पराभव करून विजयी सलामी दिली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

लॅन्सर्स वि.वि.सामुराईज 13-10

बॅडमिंटन: लॅन्सर्स वि.वि.सामुराईज 5-3(अमोल मेहेंदळे/तेजस किंजवडेकर वि.वि.मिहीर विंझे/प्रथम पारेख 30-23; अमर श्रॉफ/प्रथम वाणी वि.वि. आदिती रोडे/तुषार नगरकर 30-17; अभिजित राजवाडे/आनंद घाटे वि.वि. आशय कश्यप/आशुतोष सोमण 30-16; आलोक तेलंग/राजशेखर करमरकर पराभूत वि. अनिल देडगे/तुषार मेंगळे 23-30; दत्ता देशपांडे/सुदर्शन बिहाणी पराभूत वि.इशा घैसास/केदार देशपांडे 23-30; गौरी कुलकर्णी/पार्थ केळकर पराभूत वि. अभिजित खानविलकर/हेमंत पिंपळे 18-30; अनिल आगाशे/जयकांत वैद्य वि.वि.निलेश बजाज/निशांत भणगे 30-20; नितीन सरदेसाई/राहुल मुथा वि.वि.अमेय कुलकर्णी/यश परांजपे 30-11);

टेबल टेनिस: लॅन्सर्स बरोबरी वि.सामुराईज 4-4(आशिष बोडस/शिल्पा पांडे पराभूत वि.सिद्धार्थ गोरे/यश परांजपे 23-30; सारंग देवी/तेजस किंजवडेकर पराभूत वि.ऋचा अंबिके/तुषार नगरकर 13-30; आनंद घाटे/अभिजित मराठे वि.वि.आशुतोष सोमण/निशांत भणगे 30-27; नितीन सरदेसाई/अमित महाजनी वि.वि.अर्जुन लिमये/अभिजित खानविलकर 30-28; किया तेलंग/जयकांत वैद्य पराभूत वि.तनिश बेलगलकर/हेमंत पिंपळे 10-30; राहुल मुथा/आलोक तेलंग पराभूत वि.सारंग देवी/तुषार मेंगळे 28-30; प्रथम वाणी/सन्मय तेलंग वि.वि.निलेश बजाज/अभय राजगुरू 30-20; सिद्धार्थ मराठे/सुदर्शन बिहाणी वि.वि.प्रथम वाणी/सत्यजित लिमये 30-19);

टेनिस: लॅन्सर्स वि.वि.सामुराईज 4-3(सिद्धार्थ मराठे/अभिजित मराठे वि.वि.तनिश बेलगलकर/संजीव घोलप 30-09; सारंग देवी/राहुल मुथा पराभूत वि.सारंग पाबळकर/केदार देशपांडे 26-30; अमित महाजनी/चारुदत्त साठे वि.वि.निशांत भणगे/अभिजित खानविलकर 30-27; तेजस किंजवडेकर/सन्मय तेलंग वि.वि.हेमंत पिंपळे/तुषार नगरकर 30-23; नितीन सरदेसाई/किया तेलंग पराभूत वि. यश परांजपे/संजीव गुजर 14-20; आलोक तेलंग/अमोल मेहेंदळे वि.वि.तुषार मेंगळे/मिहीर विंझे 20-16; दत्ता देशपांडे/आनंद घाटे पराभूत वि.आशुतोष सोमण/सत्यजित लिमये 11-20);

किर्रपन्स वि.वि.मस्कीटीयर्स 14-09

बॅडमिंटन: किर्रपन्स पराभूत वि.मस्कीटीयर्स 3-5(श्रीदत्त शानबाग/सुमेध शहा वि.वि.सचिन जोशी/संदीप साठे 30-12; रणजित पांडे/शताक्षी किणीकर वि.वि.अद्वैत जोशी/पराग चोपडा 30-26; देवेंद्र चितळे/संग्राम पाटील वि.वि.बाळ कुलकर्णी/हरेश गलानी 30-12; मकरंद चितळे/सचिन अभ्यंकर पराभूत वि. आदित्य गांधी/अविनाश दोषी 21-30; कुणाल भुरोत/नंदन डोंगरे पराभूत वि. राहुल पाठक/शैलेश लिमये 10-30; शमिका एरंडे/शिरीष साठे पराभूत वि.गोपिका किंजवडेकर/निलेश केळकर 13-30; अनया तुळपुळे/सोहन वर्तक पराभूत वि.देबश्री दांडेकर/कल्पक पत्की 20-30; आरुषी पांडे/समीर जालन पराभूत वि.अंकुश मोघे/राहुल रोडे 29-30);

टेबल टेनिस: किर्रपन्स वि.वि.मस्कीटियर्स 6-2(रणजित पांडे/देवेंद्र चितळे पराभूत वि.राहुल पाठक/आदित्य दाते 10-30; सुमेध शहा/नितीन पी पराभूत वि.पराग चोपडा/कौस्तुभ वाळिंबे 11-30; कुणाल भुरोत/श्रीदत्त शानबाग वि.वि.चैतन्य रहाटेकर/शैलेश लिमये 30-26; संग्राम पाटील/मकरंद चितळे वि.वि.अद्वैत जोशी/सचिन जोशी 30-28; संतोष भिडे/अजय जाधव वि.वि.संदीप साठे/अविनाश दोशी 30-14; अभय जमेनिस/रोहन जमेनिस वि.वि.कल्पक पत्की/बाळ कुलकर्णी 30-29; अभिजित मुनोत/अमित धर्मा वि.वि.रोहन छाजेड/निलेश केळकर 30-12; शमीका एरंडे/सुविद नाडकर्णी वि.वि.आदित्य गांधी/चिन्मया दांडेकर 30-24);

टेनिस:किर्रपन्स वि.वि.मस्कीटियर्स 5-2(रणजित पांडे/रोहन जमेनिस वि.वि.पराग चोपडा/कल्पक पत्की 30-24; अजय जाधव/अभय जमेनिस वि.वि.रोहन छाजेड/अंकुश मोघे 30-17; संग्राम पाटील/देवेंद्र चितळे वि.वि.राधिका जोशी/चिन्मय दांडेकर 30-21; सचिन अभ्यंकर/मिलिंद शालगर पराभूत वि.शैलेश लिमये/पराग टेपन 17-30; अभिजित मुनोत/शिरीष साठे वि.वि.रियान माळी/रवी रावळ 20-14; आकाश भिलारे/कुणाल भुरोत वि.वि.हरिष गलानी/सुनीता रावळ 20-13; नंदन डोंगरे/सुमेध शहा पराभूत वि.राहुल पठारे/आदित्य गांधी 05-20)

You might also like