---Advertisement---

MI vs KKR : केकेआरने मुंबई इंडियन्सला दिलं जिंकण्यासाठी 117 धावांचं आव्हान

---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेतील आज म्हणजेच 31 मार्च रोजी 12 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला जात आहे. मुंबई इंडियन्स संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच केकेआर संघाला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. प्रथम फलंदाजी करताना केकेआर संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. मुंबईने जोरदार गोलंदाजी करत केकेआर संघाच्या सर्व खेळाडूंना 116 धावांवर बाद केले. केकेआरने मुंबईला जिंकण्यासाठी 117 धावांचं आव्हान दिलेल आहे.

मुंबई इंडियन्स संघासाठी सर्वोत्तम गोलंदाजी अश्वनी कुमारने केली. त्याने तीन षटकात 24 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तसेच मुंबईसाठी दीपक चाहरने 2 तसेच बोल्ट , पुथुर, हार्दिक सेंटनरने 1-1 विकेट्स घेतल्या.

मुंबई संघाने जोरदार पुनरागमन करत केकेआरला जोरदार गोलंदाजीने फक्त 116 धावांवर ऑल आउट केलेल आहे. केकेआरचा संपूर्ण संघ 16.3 षटकात ऑल आउट झाला. मुंबईच्या गोलंदाजांनी अतिशय धमाकेदार प्रदर्शन करत पुनरागमन केलेल आहे. आता मुंबई किती षटकात आव्हान पूर्ण करते हे पाहणं उत्सुकतेच असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---