आयपीएलच्या 13 व्या हंगामात शनिवारी (24 ऑक्टोबर) दोन सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी 3.30 वाजता अबूधाबी येथे कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होईल. त्यानंतर किंग्स इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद दुबईमध्ये रात्री 7.30 वाजता आमनेसामने येतील.
मागील सामन्यात कोलकाताच्या झाला पराभव
कोलकाता प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याचा आशा कायम राखण्यासाठी दिल्लीविरुद्ध जिंकण्याचा प्रयत्न करेल. मागील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने कोलकाताचा पराभव केला होता. दिल्लीला हा सामना जिंकून प्ले-ऑफमध्ये आपले स्थान सुरक्षित करायचे आहे. त्याचबरोबर कोलकाता हा सामना जिंकून स्पर्धेत टिकून राहू इच्छित आहे.
मागील सामन्यात दिल्लीने कोलकाताला 18 धावांनी केले होते पराभूत
मागील सामन्यात दिल्लीने कोलकाताचा 18 धावांनी पराभव केला होता. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने शारजाहमध्ये 4 गडी गमावून 224 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल कोलकाताला 8 बाद 210 धावा करता आल्या होत्या.
स्पर्धेत टिकण्यासाठी पंजाब, हैदराबादला सामना जिंकणे आवश्यक
यानंतर किंग्स इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने येतील. दोन्ही संघांना स्पर्धेत टिकण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे. पराभूत संघाला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकावे लागेल.
गुणतालिकेत दिल्ली आहे दुसऱ्या स्थानावर
गुणतालिकेत दिल्ली आणि कोलकाता पहिल्या 4 संघांमध्ये आहेत. दिल्ली 14 गुणांसह दुसर्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत या संघाला प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी विजयाची आवश्यकता आहे. त्याचबरोबर कोलकाता 10 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
हैदराबादने पंजाबला केले होते पराभूत
मागच्या वेळी पंजाब आणि हैदराबाद यांच्यात झालेल्या सामना हैदराबादने 69 धावांनी जिंकला होता. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 6 गडी गमावून 201 धावा केल्या होत्या. पंजाब 16.5 षटकांत 132 धावांवर सर्वबाद झाला होता.
गुणतालिकेत हैदराबाद 5 व्या व पंजाब आहे 6 व्या स्थानावर
हैदराबाद या हंगामात 4 विजयांसह 5 व्या स्थानावर आहे. त्याचवेळी, पंजाबने हंगामात 4 सामने जिंकले आहेत, परंतु नेट रनरेटमुळे हा संघ 6 व्या स्थानावर आहे.
खेळपट्टीबद्दल माहिती आणि हवामान अहवाल
अबूधाबी आणि दुबईमधील सामन्यांच्या दरम्यान आकाश स्वच्छ राहील. अबूधाबीतील तापमान 23 ते 34 अंश सेल्सिअस आणि दुबईमधील तापमान 22 ते 35 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहील. अबुधाबीमध्ये खेळपट्टी संथ गतीची असल्याने फिरकीपटूंना मदत होईल. नाणेफेक जिंकणार्या संघाला प्रथम गोलंदाजी करायला आवडेल. या आयपीएलपूर्वि झालेल्या शेवटच्या 44 टी20 सामन्यात प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय मिळवण्याचा दर 56..81% होता.
दुबईतील खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकेल. येथे खेळपट्टी संथ गतीची असल्याने फिरकीपटूंना मदत होईल. नाणेफेक जिंकणार्या संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल. या आयपीएलपूर्वी झालेल्या 61 टी20 सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय मिळवण्याचा दर. 55.74% झाला आहे.
दुबईच्या मैदानावरील आकडेवारी
या मैदानावर झालेले एकूण टी20 सामने: 61
प्रथम फलंदाजी करताना मिळालेले विजय : 34
प्रथम गोलंदाजी करताना मिळालेले विजय: 26
पहिल्या डावात सरासरी धावसंख्या: 144
दुसर्या डावात सरासरी धावसंख्या: 122
अबूधाबीच्या मैदानावरील आकडेवारी
या मैदानावर झालेले एकूण टी20 सामने: 44
प्रथम फलंदाजी करताना मिळालेले विजय : 19
प्रथम गोलंदाजी करताना मिळालेले विजय : 25
पहिल्या डावात सरासरी धावसंख्या: 137
दुसर्या डावात सरासरी धावसंख्या: 128
हैदराबादचा विजय मिळवण्याचा दर आहे पंजाबपेक्षा अधिक
आयपीएलमध्ये हैदराबादचा विजय मिळवण्याचा दर 52.96% आहे. हैदराबादने आतापर्यंत 118 सामने खेळले असून त्यापैकी 62 सामने जिंकले असून 56 गमावले आहेत. त्याच वेळी, पंजाबचा विजय मिळवण्याचा दर 45.69% आहे. पंजाबने आतापर्यंत 186 सामने खेळले आहेत, त्यापैकी त्याने 86 जिंकले आहेत आणि 100 गमावले आहेत.
कोलकाताचा विजय मिळवण्याचा दर आहे दिल्लीपेक्षा अधिक
लीगमध्ये कोलकाताचा विजय मिळवण्याचा दर 52.12% आहे. कोलकाताने एकूण 188 सामने खेळले आहेत. त्याचवेळी दिल्लीचा विजय मिळवण्याचा दर 45.13% आहे. दिल्लीने एकूण 187 सामने खेळले असून, 84 जिंकले आहेत आणि 102 गमावले आहेत. 2 सामने अनिर्णित होते.
महत्त्वाच्या बातम्या –
-काय सांगता? फक्त एका चेंडूत काढल्या २८६ धावा, वाचा कधी झाला हा अनोखा विक्रम
आयपीएलमध्ये चेन्नईविरुद्ध जे कोणत्याच संघाला करता आले नाही ते मुंबई इंडियन्सने करुन दाखवले
मुंबईविरुद्ध ५० धावा करताच चेन्नईने बेंगलोरला केले ट्रोल, जाणून घ्या कारण
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलच्या १३ व्या हंगामात धोनीचा चेन्नई संघ झाला फ्लॉप, ही आहेत ३ प्रमुख कारणे
‘त्याच’ नाव जरी घेतलं तरी लोकं म्हणायचे, ‘यावर्षी किती कोटी रुपये?’
“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला