आयपीएलमध्ये आज (30 सप्टेंबर) कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात दुबई येथे सामना होणार आहे. दोन्ही संघ या स्पर्धेचा तिसरा सामना खेळतील. केकेआरला 2 गुण मिळवून गुणतालिकेत आपले स्थान बळकट करायचे तर, राजस्थानला आणखी एक विजय मिळवून अव्वल स्थान गाठायचं आहे.
या सामन्यापूर्वी आपण दोन्ही संघाच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर नजर टाकू:
केकेआरने मागील सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला होता.त्या सामन्यात केकेआरचा संघ संतुलित वाटत होता. त्यामुळे या सामन्यात संघात बदल होणार नाहीत असे वाटते. यावेळी पुन्हा एकदा शुबमन गिल आणि सुनिल नरेन सलामीला दिसू शकतात. मधल्या फळीत दिनेश कार्तिक, ऑयन मॉर्गन, नितीश राणा, आंद्रे रसल मैदानात फलंदाजीसाठी येऊ शकतात. याशिवाय गोलंदाजी विभागात शिवम मावी, पॅट कमिन्स, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, कमलेश नागरकोटी यांना संधी मिळू शकते.
सलग दोन सामने जिंकल्यानंतर अव्वलस्थानी असलेला राजस्थानचा संघ शानदार कामगिरी करत आहे, त्यामुळे या संघात बदल होईल असे वाटत नाही. जोस बटलर आणि स्टीव्ह स्मिथ पुन्हा एकदा सलामीला फलंदाजी करतांना दिसू शकतात. त्याचबरोबर मधल्या फळीत संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा, राहुल तेवतिया, मनन वोहरा यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. गोलंदाजीत जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, टॉम करन, जयदेव उनाडकट आणि अंकित राजपूत पुन्हा मैदानात गोलंदाजीसाठी दिसू शकतात.
अशी असेल दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
कोलकाता नाइट रायडर्स:
शुबमन गिल, ऑयन मॉर्गन, नितीश राणा, दिनेश कार्तिक, आंद्रे रसल, सुनिल नरेन, शिवम मावी, पॅट कमिन्स, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, कमलेश नागरकोटी
राजस्थान रॉयल्स:
स्टिव्ह स्मिथ, रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन, मनन वोहरा, जोस बटलर, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, टॉम करन, जयदेव उनाडकट आणि अंकित राजपूत