बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 ला पर्थमध्ये धमाकेदार सुरुवात झाली आहे. पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी 17 विकेट्स पडल्या. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया पहिल्या डावात अवघ्या 150 धावांत गडगडली. यानंतर कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय वेगवान गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा डाव 104 धावांत गुंडाळला. अशाप्रकारे टीम इंडियाने घरच्या मैदानावर कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट करण्याचा नवा विक्रम केला.
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला 104 धावांत गुंडाळून 46 धावांची आघाडी घेतल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावाची सुरुवात शानदार शैलीत केली. सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी सावध खेळ करण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी चहापानापर्यंत त्यांनी एकही विकेट न गमावता धावफलकावर 84 धावा केल्या. चहापानानंतरही जयस्वाल आणि केएलची शानदार फलंदाजी सुरूच आहे. दोघांनीही लवकरच 100 धावांची भागीदारी पूर्ण केली. यानंतर लवकरच, यशस्वी जयस्वालने आपले अर्धशतक पूर्ण केले. अशा प्रकारे यावर्षी कसोटीत 50+ नऊ वेळा धावा करण्याचा विक्रम केला.
ऑस्ट्रेलियन गोलंदाज पहिल्या विकेटचा शोध घेत आहेत. पण त्यांना यश मिळत नाहीये. यादरम्यान जयस्वाल आणि केएल राहुलने मिळून टीम इंडियाची धावसंख्या 52 षटकात दुसऱ्या डावात 160 धावांपर्यंत नेली. यासह टीम इंडियाच्या सलामीच्या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर 76 वर्षे जुना विक्रम मोडला. खरे तर, यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांची 126 धावांची भागीदारी ही ऑस्ट्रेलियातील कोणत्याही भारतीय सलामी जोडीची चौथी सर्वोच्च भागीदारी आहे. यापूर्वी हा विक्रम 1948 मध्ये विनू मांकड आणि चंदू सरवते या जोडीने केला होता. त्यांनी पहिल्या विकेटसाठी या दोघांनी 124 धावांची भागीदारी केली.
भारतीय सलामी जोडीची ऑस्ट्रेलियात सर्वात मोठी भागीदारी
191 धावा- सुनील गावस्कर आणि क्रिस श्रीकांत (1986)
165 धावा- सुनील गावस्कर आणि चेतन चौहान (1981)
141 धावा – आकाश चोप्रा आणि वीरेंद्र सेहवाग (2003)
131 धावा – यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल (2024)
124 धावा- विनू मांकड आणि चंदू सरवते (1948)*
123 धावा – आकाश चोप्रा आणि वीरेंद्र सेहवाग (2004)
यानंतर जयस्वाल-केएल राहुलने दोघांनी 145 धावांची भागीदारी पूर्ण केली. त्यानंतर 2010 नंतर सेना देशांमध्ये भारतासाठी सर्वाधिक सलामीच्या भागीदारीचा विक्रम केला.
सेना (SENA) देशांमध्ये 2010 पासून भारतासाठी सर्वोच्च धावांची सलामी भागीदारी
160* – यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल पर्थ 2024
137- गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग 2010 सेंच्युरियन
126 – केएल राहुल आणि रोहित शर्मा 2021 लॉर्ड्स
117 – मयंक अग्रवाल आणि केएल राहुल 2021 सेंच्युरियन
97 – केएल राहुल आणि रोहित शर्मा 2021 नॉटिंगहॅम
हेही वाचा-
“तू मुलगी का झालास?”, चाहत्याच्या प्रश्नाला आर्यन बांगरचं थेट उत्तर; म्हणाला…
IPL 2025 लिलावापूर्वी श्रेयस अय्यरची अप्रतिम कामगिरी, या स्पर्धेत झळकावले शानदार शतक
IPL 2025; मेगा लिलावासाठी कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक? पंजाब किंग्जकडे सर्वाधिक तर….