भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि बॉलीवूड अभिनेत्री आथिया शेट्टी हे मागील काही काळापासून एकमेंकांना डेट करत आहेत. राहुल-आथियाच्या लग्नाचा विषय नेहमीच चाहत्यांच्या उत्सुकतेचा भाग ठरला आहे. चाहतेही आतुर आहेत कधी या दोघांचे लग्न होते. अशा चर्चा सुरू असताना अभिनेत्रीचे वडिल आणि अभिनेता सुनील शेट्टी यांनी लग्नाबाबत एक असे विधान केले ज्यामुळे चाहते आनंदी झाले आहेत.
सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांनी केएल राहुल (KL Rahul) आणि आथिया शेट्टी (Athiya Shetty) यांचे लवकरच लग्न होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्त माध्यमाच्या रिपोर्टनुसार, एका पत्रकाराने सुनीलला आथियाचे लग्न कधी होणार कारण राहुलचा विश्वचषक खेळून झाला आहे? असा प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर देताना सुनील म्हणाले, “लवकरच होईल.”
सुनील शेट्टीने ही गोष्ट वेब शो ‘धारावी बॅंक’ याच्या लॉन्च कार्यक्रमामध्ये सांगितली. आता त्या दोघांचे लग्न लवकर म्हणजे कधी होईल हे कळेलच. याआधी आथिया-राहुलने सांगितले होते की जेव्हा दोघे ठरवतील तेव्हा लग्न होईल. राहुलचे व्यस्त वेळापत्रक असल्याने जेव्हा त्या दोघांनाही ब्रेक मिळेल तेव्हा लग्न होईल.
दोघेही सोशल मीडियावर एकमेंकांचे फोटो पोस्ट करत असतात. त्यातच एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधले, ज्यामध्ये दोघे जेवण करताना दिसत असून एका चाहत्याने तो फोटो एका फॅन पेजवर शेयर केला होता. तसेच आथियाने क्रिकेटच्या अनेक सामन्यांना हजेरी लावली आहे. सध्या बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्यांचे- अभिनेत्रींचे लग्न होत आहेत. यामुळे चाहतेही जाणून घ्यायला उत्सुक आहेत की राहुल-आथिया कधी लग्न करणार? KL Rahul-Athiya Shetty will get married soon, father Sunil Shetty has spoken about the big story
राहुल-आथिया यांचे लग्न 2023मध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, मात्र लग्न कधी आणि कोणत्या महिन्यात होईल हे दोघांच्येही कुटुंबाने अद्यापही अधिकृतपणे सांगितले नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष: भारताची स्टार कुस्तीपटू बबीता फोगटबद्दल खास 5 गोष्टी घ्या जाणून
आंतरशालेय हॉकी: सेंट जोसेफ प्रशालेचा दणदणीत विजय