लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झालेला आयपीएल २०२२ मधील २६वा सामना केएल राहुलच्या संघाने १८ धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना राहुलच्या शतकी खेळीच्या जोरावर लखनऊने १९९ धावा फलकावर लावल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ १८१ धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि लखनऊने त्यांचा हंगामातील चौथा सामना जिंकला.
विशेष म्हणजे, हा कर्णधार राहुलचा (KL Rahul) शंभरावा आयपीएल सामना होता. त्यामुळे त्याच्यासाठी हा विजय खास राहिला (LSG Beats MI) आहे. परंतु या सामना विजयानंतर त्याला मोठा धक्काही (KL Rahul Fined) बसला आहे. षटकांची गती कमी राखल्यामुळे (Slow Over Rate) लखनऊचा कर्णधार राहुलला आयपीएलकडून १२ लाखांचा दंड ठोठावण्यात (KL Rahul Fined 12 Lakhs) आला आहे.
आयपीएलद्वारे (IPL 2022) जाहीर करण्यात आलेल्या वक्तव्यानुसार, राहुलच्या नेतृत्त्वाखालील लखनऊ संघाने मुंबईविरुद्ध २० षटके टाकण्यासाठी निश्चित वेळेपेक्षा जास्त वेळ घेतला. त्यामुळे आयपीएलच्या आचारसंहितेनुसार राहुलवर सामना फीच्या २० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. लखनऊ कर्णधार राहुलने संघावरील सर्व आरोपांचा स्विकार केला आहे. त्यामुळे या प्रकरणावर कोणती सुनावणी करण्याची गरज पडली नाही.
हेही वाचा- Video: कडकडीत शतकानंतर केएल राहुलचे ‘ट्रेडमार्क सेलिब्रेशन’, कान बंद करून मैदानावर राहिला उभा
केएल राहुलचे शतक आणि आवेश खानची भेदक गोलंदाजी
दरम्यान या सामन्यात मुंबईने (Mumbai Indians) नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत लखनऊला (Lucknow Super Giants) फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी लखनऊने निर्धारित २० षटकात ४ विकेट्स गमावत १९९ धावा केल्या होत्या. लखनऊच्या २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई संघ ९ विकेट्स गमावत फक्त १८१ धावाच करू शकला.
मुंबईचे फलंदाज पुन्हा एकदा या सामन्यात फेल ठरले. मुंबईकडून फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २७ चेंडूंचा सामना करताना ३ चौकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा फक्त ६ धावाच करू शकला. एकाही फलंदाजाला आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोठी धावांची खेळी करता आली नाही.
यावेळी लखनऊ संघाकडून गोलंदाजी करताना आवेश खानने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ३० धावा देत ३ विकेट्स खिशात घातले. त्याच्याव्यतिरिक्त जेसन होल्डर, दुष्मंता चमीरा, रवी बिश्नोई आणि मार्कस स्टॉयनिस यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना लखनऊकडून केएल राहुलने सर्वाधिक धावा केल्या. त्याने सलामीला फलंदाजी करताना शेवटच्या चेंडूपर्यंत संघाचा किल्ला लढवला. यावेळी राहुलने ६० चेंडूंचा सामना करताना नाबाद १०३ धावा कुटल्या. या धावा करताना त्याने ५ षटकार आणि ९ चौकारही चोपले.
महत्त्वाच्या बातम्या-
ये भी देखो जरा! स्टॉयनिसने भिरकावला तब्बल १०४ मीटरचा खणखणीत षटकार; नंतर दिली ‘अशी’ रिऍक्शन
Video: कडकडीत शतकानंतर केएल राहुलचे ‘ट्रेडमार्क सेलिब्रेशन’, कान बंद करून मैदानावर राहिला उभा
आनंदाची बातमी! तब्बल ४ वर्षांनंतर यंदाच्या हंगामात बीसीसीआय करणार ‘या’ गोष्टीचे आयोजन