डरहॅम। मंगळवारपासून (२० जुलै) भारतीय कसोटी संघाचा काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघाविरुद्ध डरहॅममधील चेस्टर एल स्ट्रिट स्टेडियमवर तीन दिवसीय सराव सामना सुरु झाला आहे. या सराव सामन्यात केएल राहुल आणि रविंद्र जडेजा यांनी शानदार फलंदाजी केली. राहुलने शतक केले, तर जडेजाने अर्धशतक केले.
भारताची खराब सुरुवात
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रोहित शर्माला ९ धावांवर आणि मयंक अगरवालला २८ धावांवर लिंडन जेम्सने बाद केले. तर चेतेश्वर पुजारा २१ धावांवर जॅक कार्सनविरुद्ध खेळताना यष्टीचीत झाला. त्यानंतर हनुमा विहारीला २४ धावांवर लियाम-पॅटर्सन-व्हाईटने बाद करत भारताला चौथा धक्का दिला.
पण, यानंतर केएल राहुल आणि रविंद्र जडेजाने भारताचा डाव सावरताना शतकी भागीदारी रचली. दरम्यान, केएल राहुलने त्याचे वैयक्तिक शतक आणि जडेजाने अर्धशतक पूर्ण केले. राहुल शतक केल्यानंतर रिटायर्ड हर्ट झाला. त्याने १५० चेंडूत ११ चौकार आणि १ षटकार मारत नाबाद १०१ धावा केल्या. तसेच जडेजाने १०७ चेंडूत ४ चौकारांसह त्याचे अर्धशतक पूर्ण केले.
CENTURY @klrahul11 ????
A brilliant innings ????????????
Live Stream ➡️ https://t.co/ZsCqJdCEX1#CountyXIvIndia @BCCI pic.twitter.com/4Ffzd5wnEP
— Durham Cricket (@DurhamCricket) July 20, 2021
जडेजाने केएल राहुल बाद झाल्यानंतर शार्दुल ठाकूरसह भारताच्या डावाला पुढे नेले होते. पण, शार्दुल २० धावांवर बाद झाला. त्याच्यापाठोपाठ अक्षर पटेल शुन्यावर बाद झाला. त्याचबरोबर जडेजाही १४६ चेंडूत ७५ धावांवर बाद झाला. या सामन्यात भारताने पहिल्या दिवसाखेर ९० षटकांत ९ बाद ३०६ धावा पार केल्या आहेत.
FIFTY off 107 for @imjadeja ????
Live Stream ➡️ https://t.co/ZsCqJdCEX1#CountyXIvIndia @BCCI pic.twitter.com/kw05WgEB0d
— Durham Cricket (@DurhamCricket) July 20, 2021
तीन वर्षांनंतर शतक
केएल राहुल गेल्या अनेक महिन्यांपासून भारताच्या कसोटी संघातील नियमित सदस्य नाही. या सराव सामन्यात तो रिषभ पंत आणि वृद्धिमान साहा यांच्या अनुपस्थितीत केएल राहुल यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळत आहे. तसेच केएल राहुलने या सराव सामन्यापूर्वी १६ महिन्यांआधी अखेरचा प्रथम श्रेणी सामना खेळला आहे. तो अखेरचा रणजी ट्रॉफीमधील कर्नाटक विरुद्ध बंगाल यांच्यात मार्च २०२० मध्ये झालेल्या सामन्यात खेळताना दिसला होता.
राहुलने मंगळवारी झळकावलेले शतक त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील एकूण १५ वे शतक आहे. त्याने यापूर्वी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अखेरचे शतक सप्टेंबर २०१८ मध्ये ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध केले होते. त्याने त्यावेळी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात १४९ धावा केल्या होत्या.
रोहित आहे कर्णधार
मंगळवारी सुरु झालेल्या सराव सामन्यासाठी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि फिरकीपटू आर अश्विन यांना विश्रांती दिली आहे. त्यामुळे या सामन्यात भारताचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
काय करायचे पुजाराच्या फॉर्मला? सराव सामन्यात नवख्या फिरकीपटू पुढे टाकल्या नांग्या, पाहा व्हिडिओ
फलंदाजी क्रमवारीत मितालीचा जलवा कायम, तब्बल नवव्यावेळी पटकावले अव्वल स्थान
बोल्ड होऊनही मयंकचा बसेना विश्वास, काही सेकंद एकाच स्थितीत राहिला उभा, व्हिडिओ होतोय व्हायरल