येत्या काही महिन्यात इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा भारतात होणार आहे. तसेच या स्पर्धेत मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. या स्पर्धेत लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन संघांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच खेळाडूंचा लिलाव देखील करण्यात येणार आहे.
या लिलालापूर्वी प्रत्येक संघाला ४ खेळाडूंना रिटेन करण्याची अनुमती देण्यात आली आहे. दरम्यान गेल्या काही वर्षांपासून पंजाब संघाचे नेतृत्व करत असलेला केएल राहुल आता पंजाब संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
पंजाब किंग्ज संघाने २०१८ मध्ये झालेल्या लिलावात केएल राहुलला ११ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. माध्यमातील वृत्तानुसार, केएल राहुल आता पंजाब किंग्ज संघाचे कर्णधारपद सोडून आयपीएल २०२२ स्पर्धेत संजीव गोएंका यांच्या लखनऊ फ्रँचायझीमध्ये प्रवेश करू शकतो. त्याला या संघाचे कर्णधारपद देखील दिले जाऊ शकते.
चार खेळाडूंना रिटेन करू शकतात संघ
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, चेन्नई सुपर किंग्ज संघ आपल्या ‘कॅप्टन कुल’ एमएस धोनीला रिटेन करणार आहे. तसेच ऑरेंज कॅप विजेता ऋतुराज गायकवाड आणि अष्टपैलू रवींद्र जडेजाला देखील रिटेन केले आहे. यासह आयपीएल २०२१ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा मोईन अली सोबत देखील चर्चा आहे. आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी सर्व संघांना ४ खेळाडूंना रिटेन करण्याची संधी देण्यात आली आहे.
श्रेयस अय्यरला रिलीज करू शकतो दिल्ली कॅपिटल्स संघ
चेन्नई सुपर किंग्जचे सॅम करण आणि मोईन अली यापैकी एका खेळाडूला रिटेन करण्याच्या प्रयत्नात आहे. असे झाले तर सुरेश रैनाला चेन्नई सुपर किंग्ज संघ राम राम करू शकतो. तसेच माध्यमातील वृत्तानुसार, दिल्ली कॅपिटल्स संघ माजी कर्णधार श्रेयस अय्यरला रिलीज करणार आहे. रिषभ पंत पुढील हंगामात देखील दिल्ली संघाचे नेतृत्व करणार आहे. तर मुंबई इंडियन्स संघ रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना रिटेन करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
वयाच्या २२ व्या वर्षी असा कारनामा करणारा शुबमन गिल चौथा भारतीय; दिग्गजांच्या यादीत मिळाले स्थान
मूर्ती लहान कीर्ती महान!! अवघ्या १२५ चेंडूंमध्ये १३ वर्षीय फलंदाजाने चोपल्या ३३१ धावा