आयपीएलचा तेरावा हंगाम संपून एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला. मात्र, तरीही आयपीएलची चर्चा अजूनही होत आहे. भारताचा माजी सलामीवीर व समालोचक आकाश चोप्रा हा आपल्या यूट्यूब शोवर प्रत्येक संघांचे पुनरावलोकन करताना दिसत आहे. याच शोमध्ये त्याने किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या काही चांगल्या-वाईट गोष्टींवर चर्चा केली. पंजाब संघाच्या निराशाजनक कामगिरीची जबाबदारी कर्णधार केएल राहुलने स्वीकारावी, असे मत त्याने मांडले.
राहुलने स्वीकारावी जबाबदारी
आकाश चोप्राने यूट्यूब शोमध्ये पंजाब संघाच्या कामगिरीची कारणमीमांसा केली. आकाश चोप्रा म्हणाला, “मी राहुलच्या नेतृत्वाशी अनेकदा सहमत नसायचो. पंजाबकडे एक चांगला संघ होता. मात्र, अंतिम ११ खेळाडूंची निवड करण्यात राहुल बऱ्याचदा चुकला. याला संघ व्यवस्थापनही जबाबदार आहे. परंतु कर्णधार म्हणून पुढे येऊन काही मते मांडणे आवश्यक असते. अंतिम ११ खेळाडूंची योग्य निवड न करण्याची जबाबदारी राहुलने स्वीकारायला हवी.”
अनुभवातून शिकेल राहुल
आकाश चोप्रा पुढे म्हणाला, “इतक्या मोठ्या स्पर्धेत राहुल प्रथमच नेतृत्व करत होता. राहुलला कर्णधारपदाचा अनुभव नव्हता. मात्र, त्याने गोलंदाजांचा काहीवेळा अत्यंत खुबीने वापर केला. तो सातत्याने तशा प्रकारचे नेतृत्व करू शकला नाही. तो अनुभवातून नक्कीच शिकेल. त्याची नेतृत्व अव्वल दर्जाचे नव्हते. मात्र, इतकीही वाईट नव्हती. त्याच्या नेतृत्वाला मी १० पैकी ७.५ गुण देतो.”
राहुल ठरला होता ऑरेंज कॅपचा मानकरी
केएल राहुलसाठी आयपीएल २०२० आत्तापर्यंतची सर्वात यशस्वी आयपीएल ठरली. राहुलने स्पर्धेत १४ सामने खेळताना ६६८ धावा ठोकल्या. सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूला दिली जाणारी ‘ऑरेंज कॅप’ राहुलने या हंगामात आपल्या नावे केली.
राहुल कर्णधार असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबची कामगिरी मात्र निराशाजनक राहिली. पहिल्या सात सामन्यांपैकी पंजाब अवघा एक सामना जिंकू शकला होता. स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांनी सलग पाच विजय साजरे केले. मात्र, अखेरच्या दोन सामन्यात पराभूत झाल्याने ते प्ले-ऑफसाठी पात्र ठरू शकले नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या-
“सांगा किती राशिद?”, राशिद खानने चाहत्यांना टाकलं कोड्यात
डेविड वॉर्नरच्या मधल्या मुलीला आवडतो भारताचा ‘हा’ क्रिकेटपटू, पत्नी कँडिसने केला खुलासा
दिग्गजाने निवडलेल्या परदेशी खेळाडूंच्या आयपीएल संघात स्टोक्सला डच्चू; ‘हा’ आहे कर्णधार
ट्रेंडिंग लेख-
…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात
हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश
पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी