India vs England Test Series: 25 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत केएल राहुल याचा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून समावेश करण्यात आला आहे. मात्र, तो येथे फक्त फलंदाज म्हणून खेळणार आहे. त्याला यष्टिरक्षणाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे.
बीसीसीआयच्या विश्वसनीय सूत्राचा हवाला देत टाइम्य ऑफ इंडियाच्या अहवालात असे सांगितले आहे की, भारतीय खेळपट्ट्यांवर यष्टीरक्षण करणे सोपे नाही, अशा परिस्थितीत हे काम केवळ मेन यष्टीरक्षकाला दिले जाईल आणि केएल राहुल एक फलंदाज म्हणून प्लेइंग-11चा भाग असेल. (kl rahul relieved from wicketkeeping role in ind vs eng test series ks bharat or dhruve jurel will have gloves)
बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, “आतापासून राहुल (Kl Rahul) फक्त स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून खेळणार आहे. परदेशात कसोटी सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजी करताना यष्टीरक्षकाला दूर उभे राहावे लागते, पण भारतात फिरकीपटू अधिक गोलंदाजी करतात, त्यामुळे यष्टिरक्षण करणे सोपे नसते. फिरकीसाठी अनुकूल घरच्या खेळपट्ट्यांवर चेंडू विचित्र पद्धतीने फिरू शकतो आणि उसळी घेऊ शकतो. येथे यष्टीरक्षकाला सतत वर-खाली जावे लागते. या भूमिकेसाठी मेन यष्टीरक्षकाची गरज आहे.”
सूत्रानुसार, “राहुल हा आमचा महत्त्वाचा फलंदाज आहे. त्यांना ग्लब्ज देऊन आम्ही त्यांच्यावर अतिरिक्त भार टाकू इच्छित नाही. स्टंपच्या मागे उभे राहून त्याला दुखापत होण्याची जोखीम आपण घेऊ शकत नाही. या मालिकेत केएस भरत (Ks Bharat) आणि ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) आमचे यष्टिरक्षक असतील.”
केएस भारतकडे ही चांगली संधी आहे. आतापर्यंत तो कसोटी क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक म्हणून उत्कृष्ट कामगिरी करत आहे, पण फलंदाजीत त्याने काही विशेष कामगिरी केलेली नाही. भरतने आतापर्यंत 5 कसोटी सामन्यात 18.42 च्या सरासरीने केवळ 129 धावा केल्या आहेत. त्याला संधी मिळाल्यास तो फलंदाजीत चांगली कामगिरी करून भारतीय संघात आपले स्थान पक्के करू शकतो.
ध्रुव जुरेलच्या पदार्पणाचीही दाट शक्यता आहे. जुरेलने देशांतर्गत क्रिकेटमध्ये लाल चेंडूमध्ये दमदार कामगिरी केली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची फलंदाजीची सरासरी 46.47 आहे. त्याने 15 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 790 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 249 धावा आहे. (KL Rahul will not keep wicket in England Test series? See the reason behind this decision)
हेही वाचा
आयपीएल सर्वांसाठी खास; यातूनच टी20 विश्वचषक संघ निवडला जाईल, इंदोर टी-20पूर्वी शिवम दुबेचे वक्तव्य
‘जितेश-सॅमसन रोहित शर्माची पहिली पसंती नाहीत?’ माजी भारतीय क्रिकेटपटूने सांगितले धक्कादायक कारण