सध्या भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर रंगला आहे. पण खेळाच्या चौथ्या दिवशी भारतीय संघ दुसऱ्या डावात 462 धावांत सर्वबाद झाला. भारताने न्यूझीलंडला जिंकण्यासाठी 107 धावांचं आव्हान ठेवलं आहे. तत्पूर्वी स्टार खेळाडू केएल राहुल (KL Rahul) पहिल्या डावात शून्यावर बाद झाला. दुसऱ्या डावात त्याने केवळ 12 धावांची खेळी केली. फ्लॉप शोमुळे चाहते सोशल मीडियावर राहुलला खूप ट्रोल करत आहेत.
सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर सरफराज खानच्या (Sarfaraz Khan) 150 धावा आणि रिषभ पंतच्या (Rishabh Pant) 99 धावांच्या जोरावर भारतीय संघ एकेकाळी अधिक चांगल्या स्थितीत दिसत होता. दुसऱ्या डावात चाहत्यांना त्याच्या घरच्या मैदानावर सामना खेळत असलेल्या केएल राहुलकडून (KL Rahul) खूप अपेक्षा होत्या, पण राहुल पुन्हा एकदा फ्लॉप झाला, त्यानंतर चाहत्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले. राहुलला संघातून वगळण्याची मागणी चाहत्यांनी केली आहे.
#RishabhPant ❤️ को इतना बड़ा एक्सीडेंट हुआ तो भी खतरनाक खेलता है , लेकिन पता नहीं KL Rahul की कब परफॉर्मेंस आएगी।
आखिर इसके जगह पर कोई और खिलाड़ी को मौका क्यों नहीं देती है , कब तक इसे ढोते रहेगा।#INDvNZL pic.twitter.com/C1u2MqsuOW— Gautam Yadav (@gautamBhartiye) October 19, 2024
Harsha : Do you remember last time Kl Rahul saved India from a collapse?
Ravi : No, because KL Rahul himself is part of the collapse. pic.twitter.com/6LC5UNmI98
— mufaddla parody (@mufaddl_parody) October 19, 2024
पहिल्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघाची प्लेइंग 11-
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
न्यूझीलंड- टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टिम साऊदी, एजाझ पटेल, विल्यम ओ-रोरके
महत्त्वाच्या बातम्या-
नव्या चेंडूनं केला टीम इंडियाचा गेम! न्यूझीलंडनं असा पलटवला सामना…
खेळ थांबवल्यामुळे अंपायर्सवर भडकला रोहित शर्मा, चिन्नास्वामी मैदानावर मोठा गोंधळ
बंगळुरू कसोटीत भारत पराभवाच्या उंबरठ्यावर, न्यूझीलंडला विजयासाठी हव्या फक्त इतक्या धावा