भारत आणि इंग्लंड यांच्यातील ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. या कसोटी सामन्यात दोन्ही सलामीवीरांनी इंग्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत दमदार फलंदाजी केली आहे. त्याचवेळी, या दोन्ही खेळाडूंनी मैदानावर खेळलेल्या फटक्यांमुळे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या आठवणी परत जाग्या झाल्या आहेत.
रोहित शर्माने जेम्स अँडरसनला, तर केएल राहुलने ऑली रॉबिन्सनच्या चेंडूवर एक शानदार स्ट्रेट ड्राइव्ह मारला. या दोन खेळाडूंचे स्ट्रेट ड्राइव्ह पाहून भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या आठवणी मनात ताज्या झाल्या आहेत,. सचिन तेंडुलकर स्ट्रेट ड्राईव्ह मारण्यासाठी खूप प्रसिद्ध होता.
सचिन तेंडुलकरच्या तुलनेत रोहित शर्मा आणि केएल राहुल हे दोघेही खूप वेगळे फलंदाज आहेत. तथापि, हे दोन्ही खेळाडूंनी अनेक प्रसंगी म्हटले आहे की, त्यांनी सचिन तेंडुलकरला पाहूनच फलंदाजीचे बाळकडू घेतले. त्यामुळे रोहित शर्मा आणि केएल राहुलचा हा शॉट पाहून सचिन तेंडुलकरच्या चेहऱ्यावर नक्कीच हास्य खुलले असेल.
https://twitter.com/QuickWristSpin/status/1434105978304094213?s=20
दरम्यान केएल राहुल आणि रोहित शर्माने दुसऱ्या डावात भक्कम सुरुवात केली. दोघांमध्ये पहिल्या गड्यासाठी ८३ धावांची भागीदारी झाली. रोहितने शानदार १२७ धावांची खेळी केली तर राहुलने ४६ धावांचे योगदान दिले. यासह तिसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाने ३ विकेट गमावून २७० धावा केल्या आहेत. विराट कोहली २२ तर रवींद्र जडेजा ९ धावांवर खेळत आहे. भारताकडे सध्या १७१ धावांची आघाडी आहे.
तत्पूर्वी, सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचा डाव अवघ्या १९१ धावांवर संपुष्टात आला होता. भारतीय संघाच्या प्रत्युत्तरात यजमान इंग्लंडचा पहिला डाव २९० धावांवर सर्वबाद झाला आहे. यासह इंग्लंडने भारतीय संघावर दुसऱ्या डावात ९९ धावांची आघाडीही घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडच्या गोलंदाजांचा पुजाराशी पंगा, चेंडू भिरकावत वटारले डोळे; पण प्रयत्न ठरले निरुपयोगी
शांत अन् संयमी नव्हे ओव्हलवरील खेळीत दिसला पुजाराचा ‘रुद्रावतार’, मोईनला शिकवला धडा!