सध्याच्या धावपळीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिकरीत्या जर तुम्ही निरोगी असाल, तर तुम्ही एक शानदार आयुष्य जगत आहात. कारण, अलीकडे लोकांना स्वत:कडे लक्ष देण्यासाठी वेळच नाहीये. कामाच्या अभावामुळे लोक स्वत:चा फिटनेस चांगला ठेवताना दिसत नाहीयेत. मात्र, योगा करणारा व्यक्ती हा योगा न करणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत जास्त स्वस्थ आणि आनंदी असल्याचे सांगितले जाते. योगामुळे शारीरिक, मानसिक थकवा नाहीसा होतो, आणि मनदेखील प्रसन्न राहते. तसेच, अनेक आजारांपासून आपण स्वत:चा बचाव करू शकतो. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने आपण योगाचे फायदे जाणून घेऊयात…
योगाचे फायदे (Benefits of Yoga)
निरोगी हृदय
जर तुम्ही नियमितरीत्या योगा करत असाल, तर तुम्हाला अनेक शारीरिक फायदे मिळतील. तसेच, तुमचे हृदयही निरोगी राहील. योगा केल्याने शरीरातील रक्ताभिसरण वेगाने होते. यामुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता कमी होते. यासोबतच प्राणायाम आसन केल्यामुळे हृदयापर्यंत प्राणवायू पोहोचण्यास मदत होते. यामुळे रक्त शुद्ध तर होतेच, तसेच शरीरदेखील निरोगी राहते. योगामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रोलही कमी केले जाऊ शकते.
तणाव कमी होतो
जर तुम्ही जास्त तणाव घेत असाल, तर याचा तुमच्या शारीरिक आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. अशा लोकांनी नियमितरीत्या प्राणायाम आणि मेडिटेशन केले पाहिजे. यामुळे धकाधकीच्या जीवनात दिवसभर ऊर्जावान तसेच उत्साही वाटते. याव्यतिरिक्त योगामुळे मांसपेशींना आराम मिळतो, ज्यामुळे झोपही चांगली येते आणि तणावही कमी होतो.
वजन कमी करण्यास फायदेशीर
अनेकांना लठ्ठपणाची चिंता सतावत असते. अशात वजन वाढलेल्या व्यक्तींनी सूर्य नमस्कार, कपाल भाती, प्राणायाम आणि त्रिकोणासन हे आसन केले पाहिजे. कारण, ही आसने वजन कमी करण्याची सर्वात उपयुक्त आहे. याव्यतिरिक्त हलासन या आसनामुळेही वजन नियंत्रणात राहण्यास फायदा होतो. जेवणानंतर हे आसन न करण्याचा सल्ला दिला जातो.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
योगा केल्यामुळे अनेक आजार दूर होतात आणि शरीर निरोगी राहते. तसेच, यामुळे रोगप्रतिकारक शक्त वाढण्यासही मदत होते. नियमित योगा केल्यामुळे फुफ्फुस, हदय आणि पचनसंस्थाही निरोगी ठेवते.
लवचीक शरीर
धनुरासन हा योगा केल्यामुळे तुम्हाला अनेक फायदे होतात. ज्यांना शरीर लवचीक करायचे असेल, त्यांनी धनुरासन हा योगा करावा. यामुळे हात आणि पोटाचे स्नायू मजबूत होतात. तसेच, पाठीचा कणाही लवचीक होतो. मानेला आणि खांद्यांना व्यायाम मिळतो. मात्र, हा योगा हाय बीपी, लो बीपी पेशन्ट, गर्भवती महिला तसेच मानदुखीचा त्रास असणाऱ्यांनी हे आसन न करण्याचा सल्ला दिला जातो. (know the benefits of yoga )
महत्वाच्या बातम्या-
जागतिक योगा दिवस 2023 । केव्हा आणि कशी झाली योगा दिनाची सुरुवात? जाणून घ्या इतिहास
ICC Rules : वनडे अन् टी20मधील पॉवरप्ले, कधी झाले बदल आणि काय होता बॅटिंग Powerplay नियम? वाचा
नाद नाद नादच! IPL Final गाजवणारा पठ्ठ्या TNPLमध्ये करतोय राडा, कुणीच रोखणार नाही टीम इंडियातील एन्ट्री?