Friday, March 31, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विराट की स्मिथ? शेन वॉर्नने सांगितलं होतं उत्कृष्ट कसोटी फलंदाज कोण ते…

विराट की स्मिथ? शेन वॉर्नने सांगितलं होतं उत्कृष्ट कसोटी फलंदाज कोण ते...

March 4, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Virat-Kohli-And-Steve-Smith-And-Shane-Warne

Photo Courtesy: Twitter/ICC & BCCI & cricketcomau


भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ हे आताच्या घडीला सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये सतत स्पर्धा बघायला मिळते. या दोघांविषयी ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने आपली मते मांडली होती.

विराट कोहली () आणि स्टीव स्मिथ () विषयी बोलताना शेन वॉर्न () म्हणाला होता, “विराट कोहली आणि स्मिथ यांच्यामधील एकाची उत्कृष्ट कसोटी फलंदाज म्हणून निवड करणे सध्या तरी खरंच अवघड आहे आणि उत्कृष्ट खेळाडूंना स्पर्धात्मक खेळायला आवडते.” विराटने 2017 या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 2818 धावा केल्या होत्या, तर स्मिथने 1337 धावा केल्या होत्या. स्मिथ त्या वर्षी अजून दोन कसोटी सामने खेळला. तर विराटला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी-20  मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे तो 2018च्या सुरुवातीला पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकांमध्ये खेळला होता.

त्यावेळच्या आयसीसी क्रमवारीत विराट वनडे आणि टी 20 प्रकारात अव्वल स्थानी होता, तर स्मिथ कसोटीत अव्वल क्रमांकावर होता. याबरोबरच वॉर्नने इंग्लंडच्या खेळाडूंना स्मिथशी शाब्दिक चकमक करू नका असा उपदेश केला होता. अशा शाब्दिक वादामुळे स्मिथला आणखी चांगले खेळण्याची प्रेरणा मिळते. वॉर्नने याबद्दल ब्रायन लाराची आठवण सांगून उदाहरण दिले होते. तो म्हणाला होता, आम्ही जेव्हा लाराला डिवचण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने 7 ते 8 शतके केली होती. त्यानंतर मात्र आम्ही त्याला डिवचण्याची योजना बंद केली होती.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

‘लिजेंड वॉर्नी’चा शेवट झाला तरी कसा? क्रिकेटचा भरभरून आनंद दिलेला शेन वॉर्न जाताना मात्र सर्वांनाच चटका लावून गेला, वाचा
वॉर्नच्या रूपात आयपीएलला मिळालेला पहिला चॅम्पियन कर्णधार, धोनीच्या सीएसकेला केले होते पराभूत


Next Post
Shane-Warne

'फिरकीचा जादूगार' वॉर्नची पर्सनल लाईफ नेहमीच राहिलीय चर्चेत, लग्नानंतरही ३ अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय नाव

Virat-Kohli-And-Anushka-Sharma

गळ्यात रुद्राक्षाची माळ, कपाळी चंदनाचा लेप; विराटने सपत्नीक घेतले महाकालचे दर्शन; पाहा व्हिडिओ

Womens-Premier-League-2023

WPLमधील 'हे' नियम IPL सारखेच, फक्त प्लेऑफ सामन्यांचा विषय जरासा वेगळा; जाणून घ्याच

Please login to join discussion

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143