भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. ऑनलाईन रिचर्स फर्म एसईएम रशच्या अभ्यासात हा खुलासा झाला आहे. एसईएम रशच्या अभ्यासानुसार, विराटला यावर्षी जानेवारीपासून जूनदरम्यान दर महिन्याला सरासरी १६.२ लाख वेळा सर्च करण्यात आले आहे. यादरम्यान भारतीय संघाला ऑनलाईन २.४ लाख वेळा सर्च करण्यात आले. म्हणजेच विराट हा भारतीय संघापेक्षा ८ पटीने अधिक प्रसिद्ध आहे.
या अभ्यासानुसार, विराटनंतर रोहित शर्मा जगातील दुसरा सर्वाधिक प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. त्याला जानेवारी ते जूनदरम्यान दर महिन्याला सरासरी ९.७ लाख वेळा सर्च करण्यात आले आहे. त्यानंतर एमएस धोनीचा क्रमांक लागतो. त्याला दर महिन्याला ९.४ लाख वेळा सर्च करण्यात आले आहे.
सचिन तेंडुलकरपेक्षा हार्दिंक पंड्या आहे सर्वाधिक प्रसिद्ध
यानंतर ऑस्ट्रेलियाचा जॉर्ज मॅक्के (९.१ लाख), जॉश रिचर्ड्स (७.१ लाख), हार्दिक पंड्या (६.७ लाख), सचिन तेंडुलकर (५.४ लाख), ख्रिस मॅथ्यूज (४.१) आणि श्रेयस अय्यर (३.४ लाख) इतक्या वेळा या खेळाडूंना दर महिन्याला सर्च करण्यात आले आहे.
प्रसिद्धीच्या बाबतीत इंग्लंड संघ आहे दुसऱ्या क्रमांकावर
ऑनलाईन रिचर्स फर्मच्या अभ्यासानुसार प्रसिद्धीच्या बाबतीत इंग्लंड संघ .६६ लाख च्या सर्चसोबत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया (.३३ लाख), वेस्ट इंडिज (.२९ लाख), पाकिस्तान (.२३ लाख), दक्षिण आफ्रिका (.१६ लाख), बांगलादेश (.१२ लाख), न्यूझीलंड (.१२ लाख), श्रीलंका (.०९ लाख), आयर्लंड (.०९ लाख), अफगाणिस्तान (.०५ लाख) आणि झिंबाब्वे (.०३ लाख) इतक्या वेळा या संघांना दर महिन्याला सर्च करण्यात आले आहे.
युवराज, धवनपेक्षा अधिक मंधानाला सर्च करण्यात आले आहे
प्रसिद्धीच्या बाबतीत महिला क्रिकेटपटूही मागे नाहीत. अभ्यासानुसार, भारतीय महिला क्रिकेटपटू स्म्रीती मंधाना आणि ऑस्ट्रेलियाची एलिसा पेरीला मागील ६ महिन्यात युवराज सिंग आणि शिखर धवनपेक्षाही अधिक वेळा सर्च करण्यात आले आहे. मंधाना प्रसिद्धीच्या यादीत १२ व्या आणि पेरी २० व्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-सीएसके आणि केकेआर संघ १० अतिरिक्त नेट गोलंदाजांना घेऊन जाणार यूएईला, तर दिल्ली संघ…
-केवळ धोनीने सांगितल्यामुळे ‘या’ क्रिकेटरने खेळला होता २०११ सालचा विश्वचषक
ट्रेंडिंग लेख-
-भारताच्या ८८ वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात सर्वात यशस्वी ठरलेले ५ कर्णधार
-कसोटीत खेळताना जगभर धुमाकूळ घालणारे भारताचे सर्वात यशस्वी ५ गोलंदाज
-४ दिग्गज कर्णधार ज्यांनी भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला