कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व किणी विद्यार्थी मंडळाच्या सौजन्याने पुरुष व महिला गट कोल्हापूर जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धा दिनांक ७ डिसेंबर व ८ डिसेंबर २०१९ दरम्यान किणी हायस्कूलच्या शेजारच्या मैदानावर खेळवली जाईल. शनिवारी पुरुष गटांच्या सामान्यांनी स्पर्धेला सुरवात होईल. तर महिला गटाचे सामने रविवारी होतील. सदर स्पर्धा मॅटवर होणार असून कबड्डी रसिकांसाठी खास गॅलरी करण्यात आली आहे. अशी माहिती कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी प्रा. संभाजी पाटील यांनी दिली.
चिपळूण येथे होणाऱ्या ६७ व्या वरीष्ठ गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्याचा पुरुष व महिला संघ निवडला जाईल. यास्पर्धेच्या तांत्रीक समिती मध्ये अजित पाटील, प्रा आण्णासो गावडे व कुबेर पाटील काम पाहतील. तर पंचप्रमुख म्हणून रुपेश जाधव हे काम पाहतील.