पुणे। फर्ग्युसन कॉलेज आणि नंदन बाळ टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज 16वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत मुलांच्या गटात अनिकेत चोभे, अमोघ दामले, साहिल कोठारी, अर्जुन किर्तने या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात अंतिम पात्रता फेरीत संघर्षपूर्ण लढतीत साहिल कोठारी याने दुसऱ्या मानांकित आशुतोष कवडेकरचा टायब्रेकमध्ये 2-6, 7-6(4), 6-1 असा पराभव करून आगेकूच केली. अव्वल मानांकित अनिकेत चोभेने आनंद विहारीचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.अमोघ दामलेने चौदाव्या मानांकित नीव कोठारीचा 7-5, 6-2 असा तर, चौथ्या मानांकित शार्दूल खवळेने आर्यन चांदनखेचा 3-6, 6-2, 7-6(3) असा तीन सेटमध्ये पराभव केला.
निकाल: अंतिम पात्रता फेरी: मुले:
अनिकेत चोभे [1] वि.वि.आनंद विहारी 6-2, 6-3;
साहिल कोठारी वि.वि.आशुतोष कवडेकर[2] 2-6, 7-6(4), 6-1;
अमोघ दामले वि.वि.नीव कोठारी [14] 7-5, 6-2;
शार्दूल खवळे [4] वि.वि.आर्यन चांदनखे 3-6, 6-2, 7-6(3);
अर्जुन किर्तने वि.वि.मिहीर कांतावाला 6-4, 6-3;
पियुश जाधव वि.वि.आरुष जोशी 6-1, 6-0;
अद्विक नाटेकर [6] वि.वि.नील केळकर [16] 6-2, 6-3.
महत्त्वाच्या बातम्या –
‘जर स्वत:वर विश्वास ठेवला, तर…’, टीम इंडियात निवड होताच दिनेश कार्तिकने केली मनाला भिडणारी पोस्ट
लिव्हिंगस्टोनचा षटकार ठरला ऐतिहासिक! १५ वर्षांच्या आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच झाला ‘हा’ पराक्रम
‘आपना टाईम आयेगा’, अर्जुन तेंडुलकरसाठी बहीण साराची भावूक पोस्ट व्हायरल