वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने (Kraigg Brathwaite) बांगलादेशविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कॅरेबियन संघाकडून सलग सर्वाधिक सामने खेळण्याचा गारफिल्ड सोबर्सचा (Garfield Sobers) रेकाॅर्ड मोडला. ब्रॅथवेटचा हा सलग 86वा कसोटी सामना होता. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार गॅरी सोबर्सने (1955 ते 1972) पर्यंत सलग 85 कसोटी सामने खेळले. सोबर्सने 1974 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
आपला 96वा कसोटी सामना खेळणाऱ्या क्रेग ब्रॅथवेटने (Kraigg Brathwaite) 2011 मध्ये कसोटी पदार्पण केले पण 2014 पासून एकही कसोटी गमावलेली नाही. सलग सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विश्वविक्रम इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुकच्या (Alastair Cook) नावावर आहे. त्याने सलग 159 कसोटी सामने खेळले. सलग 106 कसोटी सामने खेळणाऱ्या सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांच्या नावावर भारतीय रेकाॅर्ड आहे.
क्रेग ब्रॅथवेटच्या (Kraigg Brathwaite) आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने वेस्ट इंडिजसाठी 96 कसोटी सामने खेळले आहे. त्यामध्ये त्याने 184 डावात फलंदाजी करताना 5,769 धावा केल्या होत्या. दरम्यान त्याची फलंदाजी सरासरी 33.34 राहिली आहे. कसोटीमध्ये त्याच्या नावावर 30 अर्धशतकांसह 12 शतके झळकावली आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 212 राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
VIDEO; शुबमन गिल, अभिषेक नायरने लावली पैज! कोणी मारली बाजी?
इतिहास घडला! भारताच्या या वेगवान गोलंदाजानं एका डावात सर्व 10 विकेट्स घेतल्या!
रोहित शर्माच्या मुलाचे नाव समोर, पत्नी रितिका सजदेहने शेअर केला खास फोटो