भारतीय अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या सध्या मुंबईत आपल्या कुटूंबासमवेत वेळ घालवत आहे. तो अनेकदा त्याची पत्नी पंखुरी शर्मासोबत रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. आता या जोडप्याचा एक नविन व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये तो पंखुरी शर्मासोबत ‘बंटी और बबली’ चित्रपटातील ‘कजरा रे-कजरा रे तेरे काले काले नैना’ या प्रसिद्ध गाण्यावर जबरदस्त ठुमके मारताना दिसत आहे.
कृणाल पंड्या आणि पंखुरी शर्मा यांच्या या जबरदस्त डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवत असून, त्यांचे चाहते या व्हिडिओला लाईक आणि शेअरदेखील करत आहेत. विशेष म्हणजे हे गाणे बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका अलिशा चिनॉय यांनी गायले होते. तर अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यावर हे गाणे चित्रित केले गेले होते.
कृणाल पंड्या नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफी २०२१ स्पर्धेचा भाग होता. या पूर्ण हंगामात बडोदा संघाचे प्रतिनिधित्त्व करताना त्याने ३८८ धावा चोपल्या आहेत. यात त्याच्या २ शतके आणि २ अर्धशतकांचा समावेश होता. याबरोबरच त्याने ५ विकेट्सही घेतल्या आहेत. त्याच्या विजय हजारे ट्रॉफीतील आणि आयपीएल व टी२० क्रिकेटमधील कामगिरीला पाहता त्याला इंग्लंडविरुद्धच्या वनडे संघात संधी देण्यात आली आहे. २३ मार्चपासून वनडे मालिकेची सुरुवात होणार आहे.
कृणालने २०१८ साली वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत १८ टी२० सामने खेळताना त्याने १४ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
सूर्यकुमार यादवला सकाळी कळली ‘ही’ गोष्ट, मग इंग्लंडला चोप चोपलं अन् ठरला सामनावीर
‘विश्वचषकातील स्थान पक्क,’ सूर्यकुमारच्या आक्रमक खेळीची भारतीय दिग्गजाला भुरळ; उधळली स्तुतिसुमने
“कोणी बुमराहच्या क्षमतेवर प्रश्न…,” पाकिस्तानी खेळाडूने भारतीय गोलंदाजाला खेचले अंतर्गत वादात