---Advertisement---

आरसीबी विजयोत्सवातील दुर्दैवी घटनेत KSCAला मोठा दिलासा! ‘या’ दिवशी होणार सुनावणी

On: शुक्रवार, जून 6, 2025 8:29 PM
---Advertisement---

यंदाच्या आयपीएल हंगामातील फायनल सामना (3 जून) रोजी अमदाबादच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज आमने-सामने होते. या सामन्यात आरसीबीने ऐतिहासिक विजय मिळवत ट्राॅफीवर आपले नाव कोरले. 18 वर्षांनंतर आरसीबीने पहिली ट्रॉफी जिंकली. अशा परिस्थितीत (4 जून) रोजी संघाने बंगळुरूमध्ये जल्लोष करण्याचा निर्णय घेतला. पण, हा आनंद शोकात बदलला. कारण बंगळुरूमध्ये जल्लोष करण्यासाठी जमलेल्या लाखो चाहत्यांमध्ये अचानक चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर (5 जून) रोजी आरसीबी व्यवस्थापन आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (6 मे) रोजी सकाळी आरसीबीच्या 4 अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली. पण, आता बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात केएससीए अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात आता एक नवीन वळण समोर आले आहे. खरं तर, कर्नाटक उच्च न्यायालयाने कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या (KSCA) अधिकाऱ्यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे, कारण त्यांनी या घटनेबाबत केएससीए व्यवस्थापनाविरुद्ध दाखल केलेला खटला रद्द करण्याची मागणी न्यायालयात केली होती.

याशिवाय, आरसीबीचे मार्केटिंग आणि महसूल प्रमुख निखिल सोसले यांना (6 मे) रोजी सकाळी दुबईला जात असताना विमानतळावरून अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. निखिल यांनी त्यांच्या अटकेला आव्हान दिले आहे. या प्रकरणी अॅटर्नी जनरल म्हणाले की, आज सकाळी आरोपी निखिलला दुबईला जात असताना अटक करण्यात आली. त्यांनी सांगितले की, तपास सुरू राहू द्या. गरज पडल्यासच अटक केली जाईल. पण, कर्नाटक उच्च न्यायालय (9 जून) रोजी निखिल सोसले यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---