---Advertisement---

‘जेव्हाही मी खेळतो, तेव्हा तो माझी…’, चहलसोबतच्या स्पर्धेविषयी कुलदीपची सर्वात मोठी प्रतिक्रिया

Kuldeep-Yadav-And-Yuzvendra-Chahal
---Advertisement---

जेव्हाही एखादा खेळाडू चांगली कामगिरी करतो, तेव्हा त्याची तुलना, स्पर्धा इतर खेळाडूंसोबत होते. असेच काहीसे, भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्याबाबत आहे. कुलदीपने पहिल्या वनडेत वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक 4 विकेट्स घेतले. सामन्यानंतर त्याने चहलसोबत प्रतिस्पर्धेच्या प्रश्नावर मन जिंकणारे भाष्य केले. चायनामन गोलंदाज कुलदीपनुसार, भारतात खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळवण्यासाठी दोघांमध्ये प्रतिस्पर्धा आहे, पण तरीही चहलसोबतचे नाते कधीच खराब नाही झाले.

सन 2017 ते 2019दरम्यान एक असा काळ होता, जेव्हा भारतीय प्लेइंग इलेव्हन ‘कुलचा’ यांच्या उपस्थितीशिवाय अपूर्ण होती. खरं तर, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल (Kuldeep Yadav And Yuzvendra Chahal) यांना ‘कुलचा’ (Kulcha) जोडी म्हणून ओळखळे जाते. मात्र, 2019 विश्वचषकानंतर गोष्टी खूपच बदलल्या. दोन्ही गोलंदाजांचा फॉर्म गेला आणि वनडे क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) फॉर्ममध्ये आल्यामुळे संधी मिळण्याचा प्रश्न निर्माण झाला.

दुसरीकडे, आता कुलदीप आणि चहल यांनी राष्ट्रीय संघात पुनरागमन केले आहे. या दोघांपैकी एकच जण सध्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील आहे. गुरुवारी (दि. 27 जुलै) बार्बाडोस येथे वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (West Indies vs India) संघातील पहिल्या वनडे सामन्यात कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले होते.

https://twitter.com/ICC/status/1684775821049819136

काय म्हणाला कुलदीप?
शानदार कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कार पटकावणाऱ्या कुलदीपने आपल्या आणि चहलमधील प्रतिस्पर्धेला कमी महत्त्व दिले. तो म्हणाला की, “आम्हाला खात्री आहे. आम्हाला माहितीये की, संयोजन खूप महत्त्वाचे असते. कधी तो खेळतो, कधी मी खेळतो आणि आमच्यातील समज खूप चांगली आहे. आम्ही खूप सामान्य आहोत.”

https://twitter.com/BCCI/status/1683976746092093440

पुढे बोलताना तो म्हणाला की, “जेव्हाही मी खेळतो, तेव्हा तो माझी खूप मदत करतो. तो मला सांगतो की, मी काय करू शकतो. मी काय बदल करू शकतो. त्याला वाटते की, मी नेहमी चांगले प्रदर्शन करावे. जेव्हा तो खेळतो, तेव्हा मीदेखील असंच करतो. जेणेकरून जेव्हा तो खेळेल, तेव्हा चांगले प्रदर्शन करेल.”

कुलदीपचे शानदार प्रदर्शन
खरं तर, वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्याचा हिरो कुलदीप यादव ठरला. त्याने यादरम्यान 3 षटके गोलंदाजी करताना 6 धावा खर्चून सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे, त्याने 2 षटके निर्धावही टाकली होती. तसेच, रवींद्र जडेजानेही 3 विकेट्स घेतल्या आहेत. अशात चहलचे पुनरागमन होणे कठीण दिसत आहे. (kuldeep yadav reply on competition with yuzvendra chahal after 1st odi wi vs ind)

महत्त्वाच्या बातम्या-
IND vs WI: विंडीजसाठी ‘करो या मरो’ स्थिती, हवामान ते खेळपट्टी, दुसऱ्या वनडेबद्दल सर्वकाही एकाच क्लिकवर
ओव्हल कसोटीत ऑस्ट्रेलियाने मिळवली आघाडी, स्मिथसह कमिन्स आणि टॉड मर्फीचे महत्वपूर्ण योगदान

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---