ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणारा कोलकाता नाईट रायडर्स संघ युएई टप्प्यात दमदार कामगिरी करताना दिसतो आहे. रविवारी (२६ सप्टेंबर) चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला. तरीदेखील हा संघ प्लेऑफच्या शर्यतीत टिकून आहे. दरम्यान या संघासाठी एक वाईट बातमी पुढे आली असून, संघातील मुख्य गोलंदाज दुखापतीमुळे पूर्ण हंगामातून बाहेर झाला आहे.
सराव करत असताना झाली दुखापत
आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करणारा डाव्या हाताचा फिरकीपटू कुलदीप यादव दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे. याबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “हो, आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की, युएईमध्ये सराव करत असताना त्याच्या गुडघ्यांमध्ये गंभीर दुखापत झाली आहे. कदाचित क्षेत्ररक्षण करत असताना त्याच्या गुडघा वाकला असेल आणि त्याचवेळी त्याला गंभीर दुखापत झाली असावी.”
तसेच बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पुढे म्हटले की, “तो पुढे खेळू शकेल याची शक्यता खूप कमी होती. ज्यामुळे तो भारतात परतला आहे.” भारतात मुंबईमध्ये त्याच्या दुखपतीवर शस्त्रक्रिया झाली असून त्याला ठीक होण्यासाठी ६ ते ८ महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
तसेच आणखी एका सूत्राने माहिती देत म्हटले की, “गुडघ्याला झालेली दुखापत ही खूप गंभीर असते. खेळाडूला त्यातून बरे झाल्यानंतर एनसीएच्या फिजियोथेरपी सेशनमध्ये फिटनेस पुन्हा मिळवण्यासाठी मेहनत घेणे, त्यानंतर सराव आणि नेट सेशन ही प्रक्रिया खूप मोठी असते. हे निश्चितपणे तर नाही सांगता येणार की, तो रणजी ट्रॉफी स्पर्धा होण्यापूर्वी फिट होणार की नाही?”
विश्वचषक २०१९ पासून कुलदीप यादवच्या कारकिर्दीला वेगळे वळण लागले आहे. २०१९ नंतर त्याने आपला फॉर्म गमावला आणि त्याचे संघात स्थान मिळवणे ही कठीण झाले आहे. भारतीय संघासाठी निराशाजनक कामगिरी केल्यानंतर त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघात देखील स्थान मिळत नाहीय. त्याला आयपीएल २०२० आणि २०२१ स्पर्धेत प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. त्याच्या आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने आतापर्यंत एकूण ४५ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला ४० गडी बाद करण्यात यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा पत्ता होणार का कट? ‘करा वा मरा’च्या स्थितीत अडकले ४ सामने
‘त्याच्याकडे प्रतिभा आहे, पण काही वेळा डोक्याचा वापर करत नाही’, मॅक्सवेलवर माजी दिग्गजाची बोचरी टीका