बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. गुरूवारपासून (22 डिसेंबर) मीरपूर येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यातून भारताला एक आनंदाची तर एक निराशाजनक बातमी समोर आली. या सामन्यात कर्णधार केएल राहुल खेळणार की नाही असा प्रश्न निर्माण होत असताना त्याने नाणेफेकीवेळी मैदानावर हजेरी लावली आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. तर निराशाजन वृत्त हे की या सामन्यासाठी भारताच्या अंतिम अकरामध्ये कुलदीप यादव याला वगळले. यामुळे चाहत्यांनी राहुलला सोशल मीडियावर चांगलेच झापले आहे.
नाणेफेकीवेळी राहुल म्हणाला, “कुलदीपला बाहेर ठेवणे हा निर्णय खूप कठीण होता. त्याच्याजागी उनाडकटला घेतले असून पुनरागमन करण्याची एक चांगली संधी त्याच्याकडे आहे.” त्याच्या नसण्याने अश्विन आणि अक्षर यांच्यावर फिरकीची जबाबदारी असणार आहे, कारण कुलदीप यादव याने (Kuldeep Yadav) चट्टोग्राम कसोटीमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही विभागांमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याने 40 धावा करताना 8 विकेट्स घेतल्या होत्या. यामुळे तो सामनावीरही ठरला होता.
कुलदीपने मागील सामन्यात उत्तम कामगिरी करूनसुद्धा त्याला दुसऱ्या कसोटीतून वगळले असल्याने चाहत्यांनी राहुलवर टिकांचा भडिमार केला आहे. कुलदीप हा आधीच 22 महिन्यांनतर भारताच्या कसोटी संघात परतला होता. त्याने जबरदस्त पुनरागमन करूनही बाकावर बसवणे जाणे अतिशय अयोग्य आहे, अशा प्रकारचे विचार व्यक्त करत चाहत्यांनी ट्वीट्सचा पाऊस पाडला आहे.
Let's settel here @BCCI
As a Indian fans, We gave u this test, dream of making in final and winning of #WTC23
but never make #Klrahul captain again in any format 🙏
How #unadkat is playing in place of #kuldeepyadav in this Turner#BANvsIND #INDvBANhttps://t.co/NmvhL1ChrL
— Blue Jersey ❣️🏏 (@crictalk007) December 22, 2022
Unfortunate that Man of the Match for last test #KuldeepYadav has been dropped. Strange decision by team management 🤷🏼♂️, reason is told as “pitch condition” , however they have retained other two spinners in the team. Even #SunilGavaskar is shocked #INDvsBAN #Mirpurtest
— Sadaf Sayeed 🇮🇳 (@Sadafsayeed) December 22, 2022
Wow! Man of the Match for the last match goes out!
Nevertheless Unadkat gets a international game after huge period of time..#BANvsIND #kuldeepyadav #IndianCricketTeam— Atharva Karnik (@thoughtsofatk) December 22, 2022
कुलदीपने आतापर्यंत 8 कसोटी सामन्यांत खेळताना 34 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याने तीन वेळा एकाच डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने पहिल्या डावात 40 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या. ही त्याची कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. त्याचबरोबर तो चट्टोग्राममध्ये 5 विकेट्स घेणारा पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला होता.
भारताचा जागतिक कसोटी अजिंक्यपद 2021-23च्या अंतिम सामन्यात पोहोचण्याचा माग सुकर होण्यासाठी हा दुसरा कसोटी सामना जिंकणे आवश्यक आहे. Kuldeep Yadav was dropped from the second Test vs BAN fans angry on KL Rahul
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तब्बल 12 वर्षानंतर जयदेव उनाडकट भारताच्या कसोटी संघात, त्याच्याआधी दिनेश कार्तिकने…
एफसी गोवा विजयी हॅटट्रिकच्या शोधात; जमशेदपूर एफसी सलग आठवा पराभव टाळण्याच्या प्रयत्नात