ऍशेस 2023चा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सध्या केविंगटन ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलिया 12 धावांनी आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज स्टीव स्मिथ पहिल्या डावात संघासाठी सर्वोत्तम फलंदाजी करू शकला. यादरम्यान स्मिथ थावबाद होता-होता राहिला. पंचांच्या निर्णायमुळे त्याची विकेट वाचली. अता याच पार्श्वभूनीवर स्टीअर्ट ब्रॉड आणि मैदानाली पंच कुमार धर्मसेना यांच्यात झालेली चर्चा समोर येत आहे.
ओव्हल कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघ पहिल्याच दिवशी फलंदाजीला आला. दुसऱ्या दिवसी डावातील 78व्या षटकात स्टीव स्मिथ (Steve Smith) आणि पॅट कमिन्स खेळपट्टीवर होते. षटकातील एका चेंडूवर स्मिथ आणि कमिन्सने दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला. पण सब्स्टीट्यूट खेळाडू जॉर्ज एलहम याने मैदानात चपळाई दाखवत चेंडू पकडला आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातात दिला. यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोनेही तत्काळ हा चेंडू स्टंप्सला लावल्यामुळे क्रीजपर्यंत पोहोचताना स्मिथची चांगलीच वाताहत झाली.
बेअरस्टोने स्टंपिंग केल्यानंतर स्मिथला देखील आपन बाद झालो, असे वाटले होते. त्याने पवेलियनच्या दिशेने आपला मोर्चा वळवला देखील होता. पण तिसरे पंच म्हणून जबाबदारी पार पाडत असताना नितीन मेनन (Nitin Menon) यांनी त्याला नाबाद दिले. या संपूर्ण प्रकाराविषी स्टुअर्ट ब्रॉड म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचं तर मला नियम माहीत नाहीत. मला वाटते स्मिथला नाबाद देण्यासाठी खूप कारणे होती. पहिल्या बाजूने पाहिल्यानंतर मला तो बाद वाटला, तर दुसऱ्या बाजूने पाहिल्यानंतर बेल्स हवेत उडल्यासारख्या दिसत होत्या.”
ब्रॉडने यावेळी मैदानी पंच कुमार धर्मसेना (Kumar Dharmasena) यांसोबत झालेल्या चर्चेचा खुलाह केला. इंग्लिश दिग्गज म्हणाला, “कुमार धर्मसेना मला म्हणाले की, जर ही जिंग बेल्स (एलईडी लाईट्सवाले) असते, तर स्मिथला बाद दिले जाते. मला खरोखर याचं कारण समजत नाही.” दरम्यान, ऍशेस 2023मध्ये अद्यावर जिंग बेल्सचा वापर केल्याचे पाहायला मिळाले नाहीये. तिसऱ्या पंचांनी रिव्यू पाहिल्यानंतर बेल्स हवेत उडण्याची वेळ आणि स्मिथ क्रीजमध्ये पोहोचण्याची वेळ जवळपास सारखी होती. असात जिंग बेल्स असत्या तर बेल्स हवेत उडाल्या बरोबर लाईट चमकली असती आणि पंचांना निर्णय देण्यासाठी सोपे झाले असते. उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर पहिल्या डावात इंग्लंडने 283, तर ऑस्ट्रेलियाने 295 धावा केल्या. (Kumar Dharmasena revealed to Stuart Broad about Steve Smith’s run-out controversy)
महत्वाच्या बातम्या –
बीसीसीआयकडून संजू सॅमसनवर अन्याय! क्रिकेटच्या जंटलमनसोबत घडतंय राजकारण?
नॉर्मल वाटलो का! चपळाई दाखवत स्टोक्सने दुसऱ्या प्रयत्नात पकडला कमिन्सचा अविश्वसनीय कॅच, Video