Wednesday, February 1, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विराट-सचिनबद्दल हे काय बोलून गेला संगकारा? म्हणाला, “भारतीयांना हे दोघे…”

January 4, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Sachin Tendulkar and Virat Kohli

Photo Courtesy: Twitter/ICC


भारतात क्रिकेटला एका उत्सवासारखे नेहमीच महत्त्व दिले जाते. काहींसाठी क्रिकेटचा देव म्हणून सचिन तेंडुलकरची ओळख आहे. प्रत्येक पिढीत भारतीयांचा एक आवडता खेळाडू राहिलेला दिसतो. सध्या विराट कोहली देखील त्याच खेळाडूंपैकी एक मानला जातो. श्रीलंकेचा माजी कर्णधार व दिग्गज यष्टीरक्षक कुमार संगकारा याने नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना विराट कोहली व सचिन तेंडुलकर यांच्या तुलनेविषयी आपले मत व्यक्त केले.

सचिन तेंडुलकर व विराट कोहली यांच्या नावे क्रिकेट जगतातील अनेक विक्रम जमा आहेत. निवृत्तीनंतरही सचिनच्या चाहत्यांमध्ये थोडीही कमी झालेली नाही. दुसरीकडे विराट आपल्या कारकिर्दीच्या अखेरीकडे चालला असला तरी, आपल्या खेळाने तो जगभरातील क्रिकेटप्रेमींचे मने जिंकताना दिसतोय. याच पार्श्वभूमीवर बोलताना कुमार संघकारा म्हणाला,

“मी विराट आणि सचिन या दोघांसोबतही खेळलो आहे. निर्विवादपणे ते जगातील अव्वल क्रिकेटपटू ठरतात. भारतीयांना विराटकडून त्याच अपेक्षा असतात ज्या सचिनकडून असायच्या. किंबहुना विराटसाठीही लोकांच्या अगदी तशाच भावनाही आहेत. सचिन त्याच्या कारकिर्दीत आणि आता विराट या सर्व अपेक्षांवर खरा ठरताना दिसतोय.”

सचिन याला क्रिकेटमधील सर्वकालीन महान क्रिकेटपटू म्हटले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतकांचा विश्वविक्रम त्याच्या नावे जमा आहे. तसेच इतरही अनेक विक्रम त्याने मोडले होते. विराट त्याच्या पाठोपाठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावा करण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर दिसून येतो. तसेच सचिननंतर त्याच्याच नावे सर्वाधिक 72 आंतरराष्ट्रीय शतके आहेत. सचिन आणि विराट यांनी जवळपास पाच वर्ष एकत्रित भारतीय संघासाठी योगदान दिले.

(Kumar Sangakkara said The expectations & emotions by Indian fans for Virat Kohli are the same as Sachin in the past)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिषभ पंतबाबत मोठी अपडेट! स्टार विकेटकीपरवर पुढील उपचार मुंबईमध्ये होणार
INDvSL: विकेट घेण्यात हार्दिक अपयशी, मात्र नोंदवला अनोखा विक्रम! ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय कॅप्टन


Next Post
Gary Ballance

लॉर्ड्सवर शतक झळकावणारा इंग्लंडचा खेळाडू झिम्बाब्वेच्या टीममध्ये, टी20 संघात झाली निवड

Photo Courtesy: Twitter/Hardik Pandya

"हार्दिकचा पर्याय शोधा", चालू सामन्यातच भारतीय दिग्गजाने केली मागणी; पण का?

Suryakumar-Yadav-And-Mohammad-Rizwan

रिझवान एका, तर सूर्या दोन गोष्टीत चमकला; एकदा जाणून घ्याच

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143