करोनाचा प्रादुर्भाव हळूहळू होत असताना आता ग्रामीण भागात टेनिस बॉल क्रिकेट पुन्हा एकदा सुरू होत आहे. आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथे ११ मार्च ते १४ मार्च २०२१ ‘थोरांदळे प्रीमियर लीगचे’ आयोजन करण्यात आले होते. टेनिस बॉलवरील या क्रिकेट स्पर्धेत कुमजाई माता युवा ब्रिगेड संघाने विजेतेपद मिळवले. अंतिम फेरीत त्यांनी जय हनुमान संघाचा १४ धावांनी पराभव केला.
अंतिम फेरीचा सामना अतिशय चुरशीचा झाला. कुमजाई माता संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ षटकांत १२० धावा केल्या. या संघांकडून संग्राम मुळे याने २० चेंडूंत तब्बल ७९ धावा ठोकत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. प्रत्त्युत्तरादाखल १२१ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात आलेल्या जय हनुमान संघाने चांगली लढत देत १०६ धावा केल्या. या संघाकडून अभि पुंडे याने १७ चेंडूंत ७८ धावा केल्या. त्याला दुसऱ्या बाजूने साथ न मिळाल्याने संघाचा १४ धावांनी पराभव झाला.
त्याआधी क्वालिफायरमध्ये जय हनुमान संघाने विरोबा भैरवनाथ रायझिंग स्टार संघाचा पराभव करत थेट अंतिम फेरीत प्रवेश केला होता. एलिमीनेटरमध्ये कुमजाई माता संघाने विरोबा भैरवनाथवर ३ गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
अभि पुंडे याला मालिकावीर आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज तर सिद्धेश पोखरकर याला सर्वोत्कृष्ट गोलंदाज पुरस्काराने गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी होण्यात मंगेशभाऊ टेमगिरे, बाबाजी मिंडे, विकास मिंडे, संदीप टेमगिरे, विक्रम टेमगिरे, कैलास टेमगिरे, दिनेश टेमगिरे, किशोर टेमगिरे,धनंजय टेमगिरे आणि इतर ग्रामस्थांचे मोलाचे योगदान लाभले.
महत्त्वाच्या बातम्या –
केवळ ४ धावांनी अर्धशतक हुकलेल्या जेसन रॉयने ‘असा’ व्यक्त केला राग, पाहा व्हिडिओ
क्या बात अफगानिस्तान! क्रिकेटच्या इतिहासात केवळ ऑस्ट्रेलियालाच जमलेल्या त्या विक्रमाची केली बरोबरी
अर्धशतक करण्याआधी ‘या’ घटनेमुळे विराट कोहली झाला ट्रोल, पाहा व्हिडिओ