---Advertisement---

खराब फॉर्मात असलेल्या श्रीलंकेला मोठा धक्का, ‘हा’ प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे वनडे मालिकेतून बाहेर

On: शुक्रवार, जुलै 16, 2021 9:55 AM
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका यांच्यात येत्या १८ जुलैपासून मर्यादित षटकांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंका संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे श्रीलंका संघ या मालिकेत चांगली कामगिरी करून जोरदार पुनरागमन करण्याच्या प्रतिक्षेत असणार आहे. परंतु त्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे. मालिका सुरू व्हायला अवघे ३ दिवस शिल्लक असताना संघातील मुख्य फलंदाज संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे.

ईएसपीएन क्रीकइन्फोच्या वृत्तानुसार, श्रीलंका संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज कुसल परेरा भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेतून बाहेर झाला आहे. ईएसपीएन क्रीकइन्फोने म्हटले की, “कुसल परेराचे भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेतून बाहेर होणे निश्चित आहे. त्याच्या खांद्याला दुखापत झाली आहे. परंतु श्रीलंका संघाने त्याच्या दुखापतीबाबत अधिक माहिती दिली नाही. त्याला अधिकृतरित्या संघांबाहेर करण्यात आले नाही. परंतु डॉक्टरने म्हटले आहे की, त्याला सहा आठवडे मैदानाबाहेर राहावे लागेल.”

कुसल परेरा हा श्रीलंकेच्या मर्यादित संघाचा कर्णधार होता. परंतु खेळाडू आणि बोर्ड यांच्यात केंद्रीय करारामुळे सुरू असलेल्या वादामुळे दसून शनाकाला कर्णधारपद देण्यात आले आहे. (Kusal parera ruled out of India series due to injury)

दसून शनाका श्रीलंकेचा नवनिर्वाचित कर्णधार 
माध्यमांतील वृत्तानुसार, श्रीलंका क्रिकेटने दसून शनाकाला श्रीलंका संघाचे कर्णधारपद देण्याचा निर्णय घेतला आहे. २९ वर्षीय शनाका आक्रमक फलंदाज आणि वेगवान गोलंदाज आहे. गेल्या ४ वर्षात तो श्रीलंका संघाचे नेतृत्व करणारा १० वा खेळाडू असणार आहे. यापूर्वी उपुल थरांगा, अँजेलो मॅथ्यूज, चमारा कपुगेदारा, लसिथ मलिंगा, दिनेश चंडीमल, दिमूथ करूणारत्ने आणि कुसल परेरा यांनी २०१७ पासून श्रीलंका संघाचे नेतृत्व केले आहे.

असे आहे भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक
वनडे मालिका 
१)पहिला वनडे सामना – १८ जुलै
२) दुसरा वनडे सामना – २० जुलै
३) तिसरा वनडे सामना – २३ जुलै
टी-२० मालिका
१) पहिला टी – २०सामना – २५ जुलै
२) दुसरा टी-२० सामना – २७ जुलै
३) तिसरा टी -२० सामना – २९ जुलै

महत्त्वाच्या बातम्या-

शाम मस्तानी, मदहोश… टीम इंडियाच्या ‘कान्हा’चे बासरीवादन तुम्हालाही करेल मंत्रमुग्ध; एकदा ऐकाच

दिपक हुड्डाच्या निर्णयाने उडाली खळबळ, कृणाल पंड्यानं केलेल्या अपमानानंतर सोडला संघ

आजवर श्रीलंकेत फक्त ‘या’ ३ भारतीय कर्णधारांनी ठोकलंय शतक, नवा कॅप्टन धवन करेल हा पराक्रम?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---