आशियातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेल्या आशिया चषकाला २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरुवात होईल. तत्पूर्वी, ओमान येथे मुख्य स्पर्धेसाठीच्या एका जागेसाठी पात्रता फेरी खेळवली जात आहे. या पात्रता फेरीच्या दुसऱ्या दिवशी युएई व कुवेत यांचा सामना झाला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात कुवेतने अवघा एक गडी राखून विजय मिळवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
ओमानच्या मैदानावर सुरू असलेल्या या पात्रता फेरीच्या दुसऱ्या दिवशी कुवेतच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अनुभवी चिराग सुरी व मोहम्मद वसीम यांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. या दोन्ही फलंदाजांनी अवघ्या ८.४ षटकात युएईला ७८ धावांपर्यंत मजल मारून दिली. वसीम बास झाल्यानंतरही सुरी याने आपले आक्रमण चालू ठेवले. त्याने बाद होण्यापूर्वी ६१ चेंडूत ८८ धावांची शानदार खेळी केली. त्याच्या या महत्त्वपूर्ण योगदानाच्या जोरावर युएईने पाच बाद १७३ धावांपर्यंत मजल मारली.
Kuwait throw the Asia Cup Qualifier wide open with an upset win over UAE 👏
Scorecard: https://t.co/WwaLHeENMa
📸 @ACCMedia1 pic.twitter.com/3HvMyNfTWf
— ICC (@ICC) August 22, 2022
प्रथमच आशिया चषक पात्रता फेरी खेळत असलेल्या कुवेत संघासाठी हे आव्हान मोठे होते. मात्र, त्यांनी दबाव न घेता पावर प्लेमध्ये बिनबाद अर्धशतक गाठले. रविजा व मीत भावसार यांनी अनुक्रमे ३४ व २७ धावा केल्या. त्यानंतर त्यांनी काही बळी गमावले. मात्र, एडसन सिल्वा याने १४ चेंडूत २५ धावा करत संघाला विजयाच्या नजीक नेले. अखेरच्या षटकात विजयासाठी ९ धावांची गरज असताना काशिफने पहिल्याच चेंडूवर षटकार मारत संघाची चिंता काही शिकणे केली. त्यानंतर पाचव्या चेंडूवर चौकार मारत त्याने संघाचा विजय निश्चित केला. सिल्व याला त्याच्या आक्रमक खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने सन्मानित केले गेले.
दुसरीकडे स्पर्धेतील पहिल्या सामन्यात हॉंगकॉंगने सिंगापूरला पराभूत केले होते. पात्रता फेरी जिंकणारा संघ अ गटात भारत व पाकिस्तानशी दोन हात करेल.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी गोलंदाजाचा स्विंग बघून भल्याभल्यांची बॅट थंडावेल! तुम्हीही एकदा पाहाच
हे काय? शिखर धवन गडबडीत घालून आला वेगळीच जर्सी, नाव लपवण्यासाठी वापरली भन्नाट युक्ती