फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (18 डिसेंबर) कतारमधील लुसेल स्टेडियम येथे खेळला गेला. अर्जेंटिना आणि फ्रान्स संघांमध्ये झालेल्या या सामन्यात चांगलाच थरार बघायला मिळाला. अर्जेंटिनाना हा सामना पेनल्टी शुटआऊटमध्ये 4-2 ने जिंकत विश्वविजेते होण्याचा मान मिळवला. अर्जेंटिनाने विश्वचषक उंचावला असला तरी, उपविजेत्या फ्रान्स संघाने चांगला संघर्ष केला. त्यांचा स्टार स्ट्रायकर किलीयन एम्बाप्पे (Kylian Mbappe) याने हॅट्रिक मारली. संघ पराभूत झाला असला तरी, त्याच्या याच धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच सर्व फुटबॉलविश्वाचे लक्ष अर्जेंटिनाचा मेस्सी व फ्रान्सचा एम्बाप्पे यांच्यावर लागले होते. मेस्सीने पहिल्या हाफमध्ये पेनल्टीवर गोल नोंदवला. तर, दुसऱ्या गोलवेळी अप्रतिम चाल रचली. त्यानंतर अतिरिक्त वेळेतही त्यानेच गोल करत अर्जेंटिनाला आघाडीवर नेले होते.
मात्र, यास सर्व दरम्यान त्याच्या व अर्जेंटिना संघाच्या मध्ये केवळ किलीयन एम्बाप्पे हाच येत राहिला. 80 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत त्याने पिछाडी भरून काढली. तर, त्याच्या पुढच्याच मिनिटाला सुरेख मैदानी गोल करत संघाला बरोबरी साधून दिली. अतिरिक्त वेळेत अर्जेंटिना आघाडीवर असताना मिळालेल्या पेनल्टीवर त्याने गोल मारत आपली हॅट्रिक पूर्ण केली. विश्वचषकाच्या इतिहासात अंतिम सामन्यात हॅट्रिक मारणारा तो पहिला खेळाडू बनला. दुसऱ्या हाफमध्ये त्याचा मैदानावरील वावर इतका जबरदस्त होता की, अर्जेंटिनाचे तीन तीन डिफेंडर त्याला एकट्याला रोखण्यात अपयशी ठरत होते.
पेनल्टी शूटआउटमध्ये फ्रान्सला पराभव पत्करावा लागला असला तरी, स्पर्धेत सर्वाधिक आठ गोल करत त्याने गोल्डन बूट (Golden Boot) पुरस्कार आपल्या नावे केला. मागील विश्वचषकात त्याने सर्वात्कृष्ट युवा फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावलेला. लिओनेल मेस्सी (Leonel Messi) व ख्रिस्टीयानो रोनाल्डो यांच्यानंतर आता फुटबॉल विश्वातील पुढील मोठा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.
(Kylian Mbappe Hattrick In Final He is Next Big Thing In Football)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ट्रॉफीचे चुंबन आणि स्टेजवर डान्स; विश्वचषक जिंकल्यानंतर लिओनल मेस्सीने ‘असा’ केला जल्लोष
मेस्सीने चाहत्यांना दिलेला शब्द मोडला! विश्वचषक जिंकताच बदलला निर्णय