वेस्टइंडिजचा माजी खेळाडू आंद्रे रसेल सध्या चालू असलेला अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेटमध्ये लॉस एंजेलिस नाईट रायडर्सकडून खेळत आहे. या स्पर्धेतील नववा सामना लॉस एंजेलिस नाईट रायडर्स विरुध्द वॉशिंगटन फ्रीडम असा झाला. सामन्यात आंद्रे रसेल याने आपल्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली.
फलंदाजीमध्ये बेभान असलेला आंद्रे रसेल (Andre Russell) गगनचुंबी षटकार मारत होता. स्टेडीयममधील प्रेक्षक रसलच्या धुवादार फलंदाजीचा आनंदही लूटत होते. रसेलने 6 षटकार आणि 6 चौकारच्या मदतीने 37 चंडूत 70 धावांची जबरदस्त खेळी केली. या दरम्यान एक घटना घडली. रसेलने एक जोरदार षटकार मारला, जो जावून एका लहान मुलाच्या डोक्याला लागला. मात्र, सुदैवाने त्या मुलाला कोणतीही गंभीर दु:खापत झाली नाही.
सामना संपल्या नंतर रसेल स्व:ता त्या मुलाला भेटण्यासाठी गेला. रसेल त्या मुलाला भेटायला गेला त्या वेळी त्या मुलाच्या डोक्याला बर्फाने शेकत होते. रसेलने त्या लहान मुलाची विचारपूस केली. रसेलने मुलाच्या डोक्याचे चुंबन करत बऱ्याच वेळ गप्पाही मारल्या. रसेलने आपल्या विनोदी स्वभावातून मुलाला सांगीतले आता तू पुढच्या सामन्यात हेल्मेट घालून ये. बोलण झाल्यानंतर रसेलने त्या मुलासोबत फोटो काढले. बरोबरच ऑटोग्राफही दिला. रसेलच्या याच स्वभावाने लोकांची मने जिंकली. नाईट रायडर्सने आपल्या सोशल मीडियावर या संपूर्ण घटनेचा व्हिडियो सोडला आहे. हा व्हिडियो सर्वत्र वायरल होत आहे.
Dre Russ made sure to check on the kid who took a blow to his head from one of his sixes in Morrisville 💜
We’re glad the impact wasn’t too bad, and the li’l champ left with a smile and some mementos for a lifetime.#LAKR #LosAngeles #WeAreLAKR #MLC23 #AndreRussell @Russell12A… pic.twitter.com/EtLO5z2avx
— Los Angeles Knight Riders (@LA_KnightRiders) July 22, 2023
प्रथम फलंदाजी करताना रसेलने धुवादार खेळी केली असली तरी आपल्या संघाला पराभूत होण्यापासून तो वाचवू शकला नाही. रसेलच्या 70 धावांच्या मदतीने लॉस एंजेलिस नाईट रायडर्स संघाने 176 धावा करुन एक चांगले लक्ष उभा केले. वॉशिंगटन संघाने या लक्षाचा पाठलाग करत 19व्या षटकात 4 विकेट्स गमावून हा सामना 6 विकेटने आपल्या नावावर केला.
महत्वाच्या बातम्या –
‘असा’ असेल वनडे विश्वचषकासाठीचा भारतीय संघ! दिग्गजाने शिखर धवनलाही दिली संधी
ईशानने सांगितले चौथ्या क्रमांकावर खेळण्याचं कारण! कर्णधार-प्रशिक्षकाच्या सांगण्यावरून नाही, तर स्वतः…