भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या जगातील सर्वात धोकादायक गोलंदाजांमध्ये गणला जातो. यावर्षी झालेल्या टी20 विश्वचषकात बुमराहनं आपल्या कामगिरीनं भारताला अनेक सामन्यांत विजय मिळवून दिला होता. जगातील कोणत्याही अव्वल फलंदाजाला त्याचा सामना करणं कठीण जातं.
बुमराहच्या गोलंदाजीसह त्याच्या बॉलिंग ॲक्शनचीही बरीच चर्चा होते. अनेक युवा गोलंदाज त्याच्या बॉलिंग ॲक्शनची कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान, सोशल मीडियावर एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती जसप्रीत बुमराहच्या ॲक्शनची नक्कल करताना दिसत आहे .
काही आठवड्यांपूर्वी एका पाकिस्तानी मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, जो हुबेहुबे बुमराहच्या बॉलिंग ॲक्शनची नक्कल करत होता. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी शाळेच्या ड्रेसमध्ये बॉलिंग करताना दिसत आहे. या मुलीनं बुमराहसारख्या रनअपसह नेटमध्ये गोलंदाजी केली. या वेळी फलंदाजालाही एकही शॉट खेळता आला नाही. सोशल मीडियावर लोक या मुलीला ‘लेडी बुमराह’ म्हणत आहेत.
जसप्रीत बुमराहच्या बॉलिंग ॲक्शनला कॉपी करणारी ही मुलगी 9वीत शिकणारी विद्यार्थिनी आहे, जी न्यू इनिंग्स क्रिकेट एंटरप्राइज अकादमीमध्ये प्रशिक्षण घेते. बुमराहप्रमाणे गोलंदाजी करणाऱ्या या विद्यार्थ्यीनीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
The Impact and Influence of Jasprit Bumrah.🫡
– A young girl bowling in the Jasprit Bumrah’s action. 👏pic.twitter.com/zRTu8mZvIJ
— Tanuj Singh (@ImTanujSingh) August 17, 2024
जसप्रीत बुमराह सध्या दीर्घ विश्रांतीवर आहे. बुमराहनं जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. टीम इंडियाला चॅम्पियन बनवण्यात त्याची भूमिका महत्त्वाची होती. संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बुमराहला ‘प्लेअर ऑफ टूर्नामेंट’चा पुरस्कारानंही गौरवण्यात आलं होतं. बुमराहनं विश्वचषकाच्या 8 सामन्यांत 15 विकेट घेतल्या होत्या.
हेही वाचा –
जय शाह पहिले नसतील! यापूर्वी हे 4 भारतीय बनले आहेत आयसीसीचे अध्यक्ष, एक जण महाराष्ट्रातील
धोनी नंबर 2…ॲडम गिलख्रिस्टनं सांगितली जगातील 3 महान यष्टीरक्षकांची नावं; पहिला क्रमांक कोणाचा?
टी20 पाठोपाठ आता कसोटीतूनही राहुलचा पत्ता कट होणार? सोपं गणित समजून घ्या