पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार आणि युवा प्रतिभावान फलंदाज बाबर आजम हा फलंदाजीच्या उत्कृष्ट शैलीसाठी ओळखला जातो. आधुनिक काळातील आघाडीच्या फलंदाजांमध्ये त्याची गणना होते. मात्र, त्याच्याबाबत नुकतीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानमधील एका महिलेने बाबर आजमवर गंभीर आरोप लावले आहे. पत्रकार परिषद घेऊन महिलेने बाबरवर शारीरिक शोषण आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
बाबर क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याच्या आधीपासून ते एकमेकांना ओळखतात, असे त्या महिलेने सांगितले. ’10 वर्षांपासून बाबरने मला त्याच्या वासनेचा शिकार बनवले आणि आता तो लग्नाला नकार देत आहे’, असे आरोप या महिलेने पत्रकार परिषदेत केले आहेत.
कुटुंबातील सदस्यांनी लग्नासाठी दिला नकार
महिलेने सांगितले की, “बाबर आझम व मी एकाच भागात राहत होतो. तो माझा शाळेतील सहकारी होता. त्यामुळे आम्हा दोघांचीही चांगली मैत्री होती. सन 2010 मध्ये बाबरने प्रेमाची कबुली दिली. मी सुद्धा त्याचे प्रेम स्वीकारले. आमचे लग्न करण्याचीही योजना होती, परंतु आमच्या कुटुंबातील सदस्यांनी नकार दिला होता.”
बाबरने घरातून पळवून नेले
ती महिला पुढे बोलताना म्हणाली की, “कुटुंबियांच्या नकारानंतर आम्ही दोघांनी कोर्टातून लग्न करण्याचा निर्णय घेतला …आणि बाबरने मला घरातून पळवून नेले. त्यावेळी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याच्या घरात राहायचो. मी बाबराला लग्नासाठी बर्याचदा विचारले पण वाईट परिस्थितीचे कारण सांगत त्याने नेहमी गोष्ट टाळली.”
या दरम्यान पत्रकार परिषदेत महिलेने भाड्याने राहिलेल्या ठिकाणांची नावे देखील सांगितली.
बाबरचा संपूर्ण खर्च केला
“आमची परिस्थिती खराब होती पण मी नोकरीला लागली. सन 2014 पूर्वी मी नोकरी करण्यासोबतच सलूनही टाकले. त्यातून मिळणारा संपूर्ण पैसा मी बाबरला दिला. त्याच्या क्रिकेटपासून जगण्याचा, खाण्यापिण्याचा आणि कपड्यापर्यंतचा सगळा खर्च मी पूर्ण केला,”असेही पुढे बोलताना ती महिला म्हणाली.
लग्नाची गोष्ट टाळली
बाबरने लग्नाच्या गोष्टीला टाळाल्याबाबत सांगताना ती महिला म्हणाली की, “सन 2014 साली जेव्हा बाबरची पाकिस्तान क्रिकेट संघात निवड झाली तेव्हा त्याच्या स्वभावामध्ये बराच फरक पडला, हे मला जाणवलं. परंतु परिस्थितीमुळे मी घरी परत जाऊ शकत नव्हती. मी लग्नाबाबत बाबरला पुन्हा विचारणा केली. मात्र परिस्थिती अधिक सुधारल्यावर आपण लग्न करू, असे सांगून बाबरने पुन्हा एकदा गोष्ट टाळली.”
बाबरने ऍबॉर्शन करण्यास भाग पाडले
“सन 2016 मध्ये मी 20 आठवड्यांपासून गरोदर होते आणि जेव्हा मी बाबरला याबद्दल सांगितले, तेव्हा बाबरने एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे मला वर्तवणूक दिली. त्याने मला मारहाणही केली आणि नंतर त्याने मला ऍबॉर्शन करण्यासाठी एका ठिकाणी नेले. त्याच्या दोन मित्रांनी आणि चुलतभावानेही यात त्याची मदत केली. त्याने सांगितले की त्याचा धाकटा भाऊ उस्मान कादीर प्रत्यक्षदर्शी आहे,” असेही पुढे बोलताना त्या महिलेने सांगितले
…त्यानंतर बाबरची वासना खूप वाढली
“ऍबॉर्शननंतर बाबरने मला माझ्या कुटूंबाशी समेट करण्यास सांगितले कारण तो पाकिस्तानात फार कमी राहायचा आणि मी येथे एकटीच राहात असे. यानंतर मी माझ्या कुटुंबासमवेत बाबरच्या सांगण्यावरून सलोखा केला. त्यानंतर बाबरची वासना खूप वाढली. त्याने माझ्याशी अशा प्रकारे संबंध जोडले, ज्याची परवानगी इस्लाम व कायदा देत नाही.” असेही पुढे बोलताना ती महिला म्हणाली.
पत्नी म्हणून न्यायचा रुग्णालयात
बाबरने केलेल्या छळाबद्दल अधिक स्पष्टपणे बोलताना ती महिला म्हणाली की, “सन 2017 मध्ये त्याने पुन्हा मला मारहाण करण्यास सुरवात केली आणि माझ्याशी संबंध वाढवण्यासही सुरूवात केली. इतकेच नाही तर तो मला पत्नी म्हणून अनेकदा रूग्णालयात घेऊन जात असे आणि माझी तपासणी करत आहे.”
महिलेने याचे पुरावे मीडियाला दिले आहे.
लग्नास दिला नकार
पुढे बोलताना ती महिला म्हणाली की, “पीडितेने सांगितले की सन 2017 मध्ये मी बाबरविरूद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आणि आमच्यात काही बाबींवरून सामंजस्यही झाला. ज्यामध्ये लग्नाचाही समावेश होता. वेळ निघून गेली आणि त्यानंतरही त्याने 3 वर्षे माझा छळ केला, परंतु आता त्याने लग्नास स्पष्टपणे नकार दिला. तू माझं काहीच बिघडवू शकत नाही असे त्याने म्हटले.”
बाबरने ठार मारण्याची दिली धमकी
बाबरने दिलेल्या धमकीबद्दल सांगताना महिला म्हणाली की, “जेव्हा मी आक्षेप घेतला, तेव्हा बाबर म्हणाला की तू पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली, तर मी तुला ठार मारीन आणि म्हणाला की, मी तुझ्याबरोबर काय करेन याचा तुला अंदाजही नाही.”
…शेजारी माझी खोली असायची
एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना त्या महिलेने सांगितले की पीसीबीने पाकिस्तानमध्ये बाबरला जिथे जिथे खोली पुरविली, त्याच्या शेजारी माझी खोली असायची.
पीसीबीने याबाबत चर्चा करण्यास दिला नकार
पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना या महिलेने सांगितले की, “मी पीसीबीकडे याबाबत तक्रार देखील केली आहे, तेथून मला उत्तर मिळाले की खेळाडूचे वैयक्तिक जीवन आहे.याबाबत आम्हाला चर्चा करायची नाही.”
महत्त्वाच्या बातम्या –
IND vs AUS : प्रेमासाठी काय पण! भावाने चालू सामन्यात तरूणीला केलं प्रपोज, पाहा तिची प्रतिक्रिया
न्यूझीलंडचा सलग दुसरा विजय, वेस्ट इंडिजचा 72 धावांनी पराभव
अय्यरच्या रॉकेट थ्रो पुढे धडाकेबाज वॉर्नर गारद; Video जोरदार व्हायरल