---Advertisement---

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंचा दबदबा, पीव्ही सिंधूपाठोपाठ लक्ष्य सेनही विजयी

---Advertisement---

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू शानदार कामगिरी करत आहेत. पीव्ही सिंधूने बुधवारी (31 जुलै) बॅडमिंटनमध्ये महिला एकेरी सामन्यात एस्टोनियाच्या क्रिस्टन कुब्बाचा सरळ गेममध्ये पराभव केला. यासह सिंधू राउंड ऑफ 16 साठी पात्र ठरली आहे. दरम्यान आता लक्ष्य सेनने देखील जगातील तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू जोनाथन क्रिस्टीचा सरळ गेममध्ये पराभव केला आहे.

आज (31जुलै) ऑलिम्पिकमध्ये खेळल्या गेलेल्या पुरुष एकेरी बॅडमिंटन सामन्यात लक्ष्य सेनने ग्रुप स्टेजमध्ये जोनाथन क्रिस्टीचा पराभव केला. या विजयासह लक्ष्य सेनने बाद फेरी गाठली आहे. अटीतटीच्या सामन्यात लक्ष्य सेनने 2-0 अशा सरळ गेममध्ये विजय मिळवला. इंडोनेशियाच्या बॅडमिंटनपटू समोर पहिल्या गेममध्ये लक्ष्य सेन 2-8 ने मागे होता. मात्र त्यानंतर त्यानं कमबॅक केले. त्याने पहिला गेम 21-18 ने जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये सुरुवातीपासूनच लक्ष्य सेनचा जोनाथन क्रिस्टीवर दबदबा पाहयला मिळाला. त्याने दुसऱ्या गेममध्ये इंडोनेशियाच्या खेळाडूचा 21-12 असा सहज पराभव केला. या विजयासह लक्ष्य सेनने बाद फेरी गाठली आहे. लक्ष्यने हा सामना केवळ 28 मिनिटांत जिंकला.

लक्ष्य सेन हा आपला पहिला ऑलिम्पिक खेळत आहे. पदार्पणाच्या स्पर्धेतच लक्ष्य सेन आपले अचूक लक्ष्य गाठत आहे. पहिल्या सामन्यात त्याने केविन कोर्डनला हरवले होते. पण दुखापतीमुळे कोर्डन ऑलिम्पिकमधून बाहेर पडला. यानंतर त्या सामन्याचा निकाल रद्द करण्यात आला. परिणामी लक्ष्य सेनचा पहिला सामना बाद घोषित करण्यात आला आहे.

हेही वाचा-

कोल्हापूरचा पोरगा ऑलिम्पिक फायनलमध्ये! नेमबाज स्वप्नील कुसाळे सुवर्ण पदकाचा वेध घेणार
नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कधी चमकणार? पाहा गोल्डन बॉयचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर
पीव्ही सिंधूची पदकाच्या दिशेनं वाटचाल, राउंड ऑफ 16 मध्ये धडाक्यात एंट्री

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---