सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र क्रिकेट सामन्यांना स्थगिती देण्यात आली होती. काही टी20 स्पर्धा देखील थांबवण्यात आल्या होत्या. परंतु, आता कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने सर्वत्र स्पर्धा सुरू केल्या जात आहेत. याच दरम्यान लंका प्रीमियर लीग टी 20 स्पर्धेचे दुसरे सत्र 30 जुलै ते 22 ऑगस्ट या दरम्यान बायोबबलमध्ये आयोजित केले जाणार आहे.
मागील वर्षी देखील या स्पर्धा बायोबबलमध्येच खेळवली गेली होती. लंका प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्रामध्ये आरोग्य योजनेच्या आधारे आरोग्य मंत्रालयाच्या आदेशावरून या सामन्याचे आयोजन केले जाईल. या स्पर्धेच्या पहिल्या सत्रामध्ये इरफान पठाण, मुनाफ पटेल आणि सुदीप त्यागी हे भारतीय खेळाडू सहभागी झाले होते.
या स्पर्धेत श्रीलंकेच्या विविध शहरांच्या नावाने असणाऱ्या पाच संघांमध्ये एकूण 23 सामने खेळवले जातात. मागीलवर्षी अंतिम सामन्यात गॅले ग्लेडिएटर्सविरूद्ध जाफना स्टॅलियन्सने 53 धावांनी विजय मिळविला होता आणि लंका प्रीमीयर लीगचे पहिले विजेतेपद जिंकले होते. मागीलवर्षी झालेल्या पहिल्या सत्रात वनिंदू हसरंगा याला मालिकावीर पुरस्कार मिळाला होता. या स्पर्धेत दनुष्का गुणथिलाका (गॅले ग्लेडिएटर्स) याने सर्वाधिक 476 धावा बनविल्या होत्या. सर्वाधिक 17 बळी वनिंदू हसरंगा (जाफना स्टॅलियन्स) याने घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय चाहत्यांची खिल्ली उडवणे मॉर्गन-बटलरला पडणार महागात, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून होणार निलंबित?
विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत एकाच डावात सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज