इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना जोरदार सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने मुंबई इंडियन्स संघाला पराभूत केले होते. तर सोमवारी (२० सप्टेंबर) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ ओएन मॉर्गनच्या कोलकाता नाईट रायडर्स संघावर भारी पडणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु कोलकाता नाईट रायडर्स संघातील गोलंदाजांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील फलंदाजांना पूर्णपणे बॅकफूटवर ठेवले होते.
परिणामी कोलकाता नाईट रायडर्स संघाने हा सामना ९ गडी राखून आपल्या नावावर केला. या सामन्यानंतर कसे आहे गुणतालिकेचे समीकरण, चला जाणून घेऊया.
रॉयल चॅलेंजर्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी देखील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ १० गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी कायम आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आतापर्यंत एकूण ८ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना ५ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर ३ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स संघाने हा सामना जिंकून ६ गुणांसह गुणतालिकेत ५ व्या स्थानी उडी मारली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने आतापर्यंत या स्पर्धेत एकूण ८ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना ३ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर ५ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
तत्पूर्वी मुंबई इंडियन्स संघाला पराभूत करत चेन्नई सुपर किंग्स संघाने १२ गुणांसह आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. तसेच दिल्ली कॅपिटल्स संघ देखील १२ गुणांसह आयपीएलच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ १० गुणांसह तिसऱ्या आणि मुंबई इंडियन्स संघ ८ गुणांसह आयपीएलच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा दणदणीत विजय
या सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील फलंदाजांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. ज्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ९२ धावांवर संपुष्टात आला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघातील सलामीवीर फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली होती. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाने हा सामना ६० चेंडू आणि ९ गडी शिल्लक असतानाच आपल्या नावावर केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
वेंकटेशचे ‘स्वप्नवत पदार्पण’, जेमीसनच्या भेदक चेंडूवर ८८ मीटरचा षटकार ठोकत लुटली मैफील
चक्रवर्तीच्या चक्रीवादळात अडकला मॅक्सवेल, चेंडूने गर्रकन फिरकी घेत क्षणात उडवल्या दांड्या
कार्तिकने गाठला धोनी, आरसीबीच्या सलामीवीराला झेलबाद करत ‘या’ विक्रमांत बनला नंबर १