आयसीसीने महिला फलंदाजांची नवीन एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्डला लॉटरी लागली असून तिने अव्वलस्थानी झेप घेतली आहे. तिला चांगल्या कामगिरीचा फायदा झाला आहे. तर भारताच्या स्मृती मानधना आणि इंग्लंडच्या नॅट सेव्हियर ब्रंट यांना क्रमवारीत नुकसान सोसावे लागले आहे.
लॉरा वोल्वार्डला महिला फलंदाजांच्या नवीन आयसीसी महिला एकदिवसीय क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला असून ती पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. तिच्याकडे सध्या 765 रेटिंग गुण आहेत. श्रीलंकेच्या चमारी अटापट्टूनेही एका स्थानाची प्रगती केली आहे. ती दुसऱ्या क्रमांकावर उपस्थित आहे. तिच्याकडे 733 रेटिंग गुण आहेत. नेट सेव्हियर ब्रंट तिसऱ्या स्थानावर आहे. तिच्याकडे 732 रेटिंग गुण आहेत. याआधी ती पहिल्या क्रमांकवर होती. आता तिला दोन स्थानांचा नुकसान झाला आहे.
लॉरा वॉलवॉर्ट गेल्या काही काळापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून तिने संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. तिने 2016 मध्ये आफ्रिकेसाठी वनडे पदार्पण केले. तेव्हापासून तिने 100 एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 4242 धावा केल्या आहेत. ज्यात 8 शतके आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिची सर्वोच्च धावसंख्या 184 धावा आहे.
महिला फलंदाजांच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत फक्त एक भारतीय खेळाडू टॉप-10 मध्ये आहे आणि ती म्हणजे स्मृती मानधना. मंधाना सध्या पाचव्या क्रमांकावर असून तिच्याकडे 700 रेटिंग गुण आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत मानधनाला चांगली कामगिरी करता आली नाही.
आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतील टॉप-10 महिला फलंदाज
लॉरा वॉलवॉर्ट- 765 रेटिंग गुण
चमारी अटापट्टू- 733 रेटिंग गुण
नेट सेव्हियर ब्रंट- 732 रेटिंग पॉइंट्स
एलिस पॅरी- 714 रेटिंग गुण
स्मृती मानधना- 700 रेटिंग गुण
बेथ मूनी- 700 रेटिंग गुण
मेरीजेन कॅप – 656 रेटिंग गुण
सोफी डिव्हाईन- 654 रेटिंग गुण
एलिसा हिली- 650 रेटिंग पॉइंट्स
हेली मॅथ्यूज- 647 रेटिंग गुण
हेही वाचा-
विराट-रोहित नाही, तर हार्दिक पांड्या या वर्षातील सर्वाधिक सर्च केलेला क्रिकेटपटू, कुस्तीपटू विनेश फोगट अव्वलस्थानी
मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन; बी.ए.आर.सी. व्यावसायिक गटाच्या उपांत्य फेरीत
पंजाब किंग्जच्या या खेळाडूकडे संघाचं नेतृत्व, या लीग मध्ये दिसणार कर्णधाराच्या भूमिकेत