भारताचा माजी टेनिसपटू लिएंडर पेस (Leander Paes) हा सध्या हिंदी सिनेमा ‘मोहब्बतें’मधील अभिनेत्री किम शर्मा (Kim Sharma) हिला डेट करतो आहे. हे कपल सतत त्यांच्या चाहत्यांसाठी आपले इंटिमेट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. यादरम्यान लिएंडरला मुंबईच्या एका मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट कोर्टाने तगडा झटका दिला आहे. कोर्टाने त्यांच्या एका निर्णयात लिएंडरला त्याची माजी साथीदार, मॉडल आणि अभिनेत्री रिया पिल्लई (Rhea Pillai) हिच्याबरोबर कौटुंबिक हिंसेच्या आरोपात दोषी ठरवले आहे. यासोबतच त्याला मासिक भरपाई देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
रिया पिल्लईने यापूर्वी २०१४ साली लिएंडरविरोधात कौटुंबिक हिंसेचा आरोप केला होता. मुंबईतील कोर्टाने आता याच केसबद्दल सुनावणी करताना हा आदेश जारी केला आहे. जर रियाने त्यांचे सामायिक निवासस्थान सोडून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला; तर लिएंडरला दर महिन्याला १ लाख रुपये मासिक पोटगी द्यावी लागेल. तसेच घर भाड्याचे ५० हजारही वेगळे द्यावे लागतील.
दरम्यान लिएंडर आणि रिया जवळपास ८ वर्षे एकमेकांसोबत लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहिले होते. यादरम्यान २०१३ मध्ये रियाने लिएंडरविरोधात महिला कौटुंबिक हिंसा संरक्षण अधिनियमाअंतर्गत (Domestic Violence Protection Act) कोर्टात केस दाखल केली होती. यावेळी तिने कोर्टात असा दावाही केला होता की, ती गेल्या ८ वर्षांपासून लिएंडरसोबत लिव-इनमध्ये राहिली आहे. यादरम्यान लिएंडरने तिचे शाब्दिक, भावनिक आणि आर्थिक शोषण केले होते.
रियाद्वारे लिएंडरवर लावले गेलेले हे सर्व आरोप आता खरे सिद्ध झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट कोर्टाने म्हटले आहे की, टेनिसमध्ये लिएंडरची कारकिर्द जवळपास संपुष्टात आली आहे. अशात जर रियाला तिच्या मासिक पोटगीव्यतिरिक्त भाड्याच्या घरात राहण्याचे आदेश दिले गेले, तर हा एकप्रकारे त्याच्यावर अत्याचार होईल. पण जर रिया लिएंडरसोबत एकाच घरात राहण्यास तयार झाली, तर तिला दर महिन्याला घर भाड्याचे ५० हजार रुपये मिळणार नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्या टी२०तील पराभवानंतर श्रीलंकेला दुहेरी धक्का! ‘हे’ २ खेळाडू भारताविरुद्धच्या मालिकेतून बाहेर