इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये २४व्या सामन्यात गुरुवारी (दि. १४ एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स संघ आमने-सामने होते. या सामन्यात नाणेफेक जिंकून राजस्थान संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यावेळी फलंदाजीला आलेल्या गुजरात संघाने एका खास यादीत स्थान मिळवले आहे.
या सामन्यात गुजरात (Gujarat Titans) संघाने प्रथम फलंदाजी करताना पावरप्लेमध्ये दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मॅथ्यू वेडची विकेट गमावली. त्यानंतर तिसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर गुजरातने विजय शंकरच्या रूपात आपली दुसरी विकेट गमावली. यावेळी वेडने १२ धावा, तर शंकरने फक्त २ धावा केल्या होत्या. या सामन्याच्या पावरप्लेमध्ये गुजरात संघाला एकही षटकार मारता आलेला नाहीये. मात्र, त्यांनी या हंगामातील दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) खेळताना पावरप्लेमध्ये १ षटकार मारला होता. त्यामुळे त्यांचा आयपीएल २०२२मध्ये पावरप्लेमध्ये किमान षटकार ठोकणाऱ्या संघांच्या यादीत समावेश झाला आहे.
या यादीत सर्वाधिक षटकार मारणारा संघ पंजाब किंग्स आहे. त्यांनी या हंगामात पावरप्लेमध्ये १४ षटकार मारले आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्स संघ आहे. त्यांनी या हंगामात पावरप्लेमध्ये एकूण १० षटकार चोपले आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स संघ आहे. मुंबईने या हंगामात पावरप्लेमध्ये एकूण ९ षटकार खेचले आहेत. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने ६, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ५, दिल्ली कॅपिटल्सने ५, कोलकाता नाईट रायडर्सने ४, सनरायझर्स हैदराबादने ३, आणि लखनऊ सुपर जायंट्सने या हंगामात पावरप्लेमध्ये ३ षटकार मारले आहेत. यानंतर शेवटी गुजरात संघाचा क्रमांक लागतो. गुजरातने या हंगामात पावरप्लेमध्ये फक्त १ षटकार मारला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
यापूर्वी गुजरात संघाने या हंगामात ४ सामने खेळताना ३ सामने जिंकले आहेत. तसेच, त्यांना १ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. ते गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहेत.
आयपीएल २०२२मध्ये पावरप्लेमध्ये किमान षटकार मारणारे संघ
१४ षटकार- पंजाब किंग्स
१० षटकार- राजस्थान रॉयल्स
९ षटकार- मुंबई इंडियन्स
६ षटकार- चेन्नई सुपर किंग्स
५ षटकार- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स
४ षटकार- कोलकाता नाईट रायडर्स
३ षटकार- सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स
१ षटकार- गुजरात टायटन्स*
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सामन्यानंतर कर्णधार मयंक अगरवालला फलंदाजी टिप्स देताना दिसला सचिन तेंडुलकर, व्हिडिओ व्हायरल