fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

…आणि ओसामा बीन लादेनने लावली फूटबाॅल सामन्याला हजेरी, झाला मोठा वाद

सध्या जगात जरी क्रीडा सामने सुरु झाले असले तरीही प्रेक्षकांना मैदानात हजेरी लावता येत नाही. प्रेक्षक मैदानात येत नसले तरी खेळाडूंना प्रेक्षक मैदानात येऊन पाठींबा देतात, असा अनुभव येण्यासाठी मैदानावर चाहत्यांचे पोस्टर्स खुर्चीवर ठेवले जातात. कोरोना व्हायरस या जागतिक महामारीमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.

याचमुळे इंग्लंडमधील अनेक क्लबने देखील थेट चाहत्यांकडून त्यांच्या आवडीचे पोस्टर्स मागितले होते. चाहत्यांचे हे पोस्टर इंग्लंडमधील क्लब सामन्यादरम्यान स्टेडियममधील खुर्च्यांवर ठेवणार आहेत.

यात कुणीतरी चाहत्याने अल कायदाचा प्रमुख व अमेरिकेकडून मारला गेलेल्या ओसामा बीन लादेनचा पोस्टर Elland Road येथील एका स्टॅंडमध्ये ठेवला होता. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर तो तेथून लीड्स युनायटेडने हटवला. तसेच चाहत्यांची माफीही मागितली.

यापुढे अशा कोणत्याही प्रकारचे वादग्रस्त फोटो मैदानावर दिसणार नसल्याची खात्री लीड्स युनायटेड दिल्याचे वृत्त बीबीसीने दिले आहे. यामुळे शनिवार होणारा Fulham विरुद्धच्या सामन्यात असे कोणतेही छायाचित्र किंवा फोटो मैदानावर दिसणार नाहीत.

यापुर्वी ऑस्ट्रेलियन मीडियानेही अशाच प्रकारचे वृत्त दिले होते. ज्यात सिरीयल किलर हेरॉल्ड शिपमॅनचे पोस्टर राष्ट्रीय रग्बी लीगमध्ये पेनरिथ पॅंथर व न्यकॅसल नाईटच्या सामन्यात दिसल्याचे सांगितले होते.