वाघ कितीही म्हातारा झाला तरी शिकार करणे विसरत नाही. ही म्हण वेस्ट इंडीजच्या ब्रायन लारा यांच्यावर तंतोतंत लागू होते. हे सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून साफ सिद्ध होते. या व्हिडीओत 24 वर्षीय दिग्गज फिरकीपटू राशिद खान 53 वर्षीय ब्रायन लारा यांच्या विरुद्ध नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसला. राशिद आणि लारा यांच्यातील मजेशीर लढतीचा व्हिडीओ माध्यंमांनी यू-ट्यूबवर शेअर केला आहे.
राशिद खान (Rashid Khan) आणि ब्रायन लारा (Brian Lara) यांचा नेट्समधील खेळतानाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये ब्रायन लारा हे राशिद खान याच्या चेंडूंवर जुन्या शैलीत फटकेबाजी करताना दिसत आहे, ज्यामुळे ते जगभरात ओळखला जातात. या दरम्यान लाराने राशिदच्या चेंडूंवर आपला ट्रेड मार्क शॉट बरोबरच बॅकफूट ड्राईव्ह शॉट खेळताना दिसले.
लारा यांच्याविरुद्ध विरुद्ध गोलंदाजी राशिद खान म्हणाला की हा एक शानदार अनुभव होता. राशिद म्हणाला की, “तुम्ही त्यांच्याविरुद्ध गोलंदाजी करण्याचा स्वप्नातही विचार करु शकत नाही. काहीही असो, पण माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. माझ्यासाठी हा सर्वात चांगल्या क्षणांमधील एक क्षण होता.”
ब्रायन लारा यांचा हा व्हिडीओ आता सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. अशी दृष्य पाहून चाहत्यांनी आनंदाच्या भरात आवाहन केले लारा यांना वेस्ट इंडिजच्या संघात पुन्हा स्थान द्यावे.
फक्त वेस्ट इंडिचच नव्हे तर जगातील महान फलंदाजांमध्ये त्यांचा समावेश होतो. ब्रायन लारा यांच्या नावावर कसोटी आणि एकदिवसीय अशा दोनही प्रकारात 10 हजारांपेक्षा अधिक धावा आहेत. लारा यांनी 131 कसोटी सामन्यात 50 पेक्षा अधिकच्या सरासरीने 11953 धावा केल्या आहेत. तसेच एकदिवसीय सामन्यात 40 पेक्षा अधिकच्या सरासरीने 10405 धावा केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ईशान किशनने द्विशतक ठोकताच रोहितही बनला फॅन; फोटो शेअर करत म्हणाला, ‘या क्लबची…’
सलाम तुझ्या समर्पणाला! 3 दिवसांपूर्वी पडले होते 4 दात, आता पुनरागमन करत संघाला बनवले विजयी