मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात ४८ वा सामना मंगळवारी (३ मे) गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्सने ८ विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान, पंजाबच्या या विजयाबरोबरच सामन्यानंतर सर्वाधिक चर्चा झाली ती पंजाबकडू खेळणाऱ्या अष्टपैलू लियाम लिव्हिंगस्टोनने मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर मारलेल्या लांबलचक षटकाराची.
या सामन्यात गुजरातने पंजाबसमोर (Gujarat Titans vs Punjab Kings) १४४ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला अखेरच्या ५ षटकात २७ धावांची गरज होती. पण लिव्हिंगस्टोनने (Liam Livingstone) १६ व्या षटकातच २८ धावा काढत पंजाबला विजयी केले. गुजरातकडून हे षटक मोहम्मद शमी (Mohammed Shami) टाकत होता. याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर लिव्हिंगस्टोनने आयपीएल २०२२ मधील (IPL 2022) सर्वोत लांब षटकार (Longest Six) मारला.
झाले असे की, शमीने १६ व्या षटकातील पहिला चेंडू टाकला आणि लिव्हिंगस्टोनने चेंडूच्या वेगाचा फायदा घेत डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला जोरदार शॉट खेळला. हा चेंडू थेट ११७ मीटर अंतर कापत षटकारासाठी गेला (117 meter Six). एवढा लांब षटकार गेल्यानंतर गुजरातचा उपकर्णधार राशिद खान लिव्हिंगस्टोनची बॅटही तपासण्यासाठी आला होता. तसेच स्वत: लिव्हिंगस्टोन आणि शमीदेखील चकीत झाला होता. इतकेच नाही तर पंजाबचा कर्णधार मयंक अगरवालही त्याच्या चेहऱ्यावरील आश्चर्याचे भाव लपवू शकला नाही.
लिव्हिंगस्टोनने मारलेला हा षटकार आयपीएल २०२२ मधील सर्वांत लांब षटकार ठरला आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावरही लिव्हिंगस्टोनच आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध १०८ मीटरचा षटकार खेचला होता. ११२ मीटर षटकारासह मुंबई इंडियन्सचा युवा क्रिकेटपटू डेवाल्ड ब्रेविस आहे.
लिव्हिंगस्टोनने १६ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूनंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवरही षटकार खेचले. तसेच षटकाच्या शेवटच्या तीन चेंडूत २ चौकार मारले. त्यामुळे याच षटकात पंजाबचा विजय निश्चित झाला.
Holyyy Mother of ****
Livingstone- An absolute Monster
117mtr Six… What a Gigantic ball striker @liaml4893 pic.twitter.com/bTGDMKGcnQ— philliphereᝰ (@thephilliphere) May 4, 2022
https://twitter.com/waadaplaya/status/1521673603053494279
लिव्हिंगस्टोन शानदार फॉर्ममध्ये
आयपीएल २०२२ मध्ये लिव्हिंगस्टोन शानदार फॉर्ममध्ये दिसून आला आहे. त्याने १० सामन्यात ३ अर्धशतकांसह २९३ धावा केल्या आहेत. तसेच त्याने ३ विकेट्सही घेतल्या आहेत. लिव्हिंगस्टोनने २०१९ साली आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. पण २०२२ हंगामापूर्वी त्याला केवळ ५ सामन्यात खेळण्याचीच संधी मिळाली होती.
व्हिडिओ पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
पंजाबने जिंकला सामना
गुजरातने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १४३ धावा केल्या. त्यांच्याकडून साई सुदर्शनने सर्वाधिक ६५ धावांची खेळी केली. तसेत वृद्धिमान साहाने २१ धावा केल्या. अन्य कोणाला २० धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. पंजाबकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर १४४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबकडून शिखर धवनने अर्धशतक करत नाबाद ६२ धावा केल्या. तसेच भानुका राजपक्षेने आक्रमक खेळत ४० धावा केल्या. त्याचबरोबर लिव्हिंगस्टोनने १० चेंडूत नाबाद ३० धावांची खेळी केली. त्यामुळे पंजाबने १६ षटकातच २ बाद १४५ धावा करत सामना जिंकला. गुजरातकडून मोहम्मद शमी आणि लॉकी फर्ग्यूसनने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
बापरे बाप! विराट अन् रैनाला मागे टाकत धवन ‘या’ विक्रमात पोहोचला शिखरावर, ‘हिटमॅन’शी साधली बरोबरी
ऋषी धवनच्या डायरेक्ट थ्रोमुळे कोलमडला गुजरात टायटन्सचा डाव, शुबमन गिलने स्वस्तात गमावली विकेट
गोलंदाजांना चोपण्यात लिविंगस्टोन माहीर; बनला आयपीएलमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज