भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआय मागच्या 15 वर्षांपासून यशस्वीपणे आयपीएलचे आयोजन करत आले आहे. बीसीसीआयने आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना खेळण्यास बंदी घातल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपली स्वतःची टी-20 लीग सुरू केली. बीसीसीआयने यावर्षी पहिल्यांदाच महिला प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यूपीएलची सुरुवात केली. अशात पीसीबीनेही लगेचच महिलांची पीएसएल स्पर्धा सुरू केली.
महिला पीएसएल (Women’s PSL) चा पहिला सामना 8 मार्च (बुधवार) रोजी खेळला गेला. स्पर्धेत फक्त दोनच महिला संघ खेळताना दिसणार आहेत. एका संघाचे नाव ऍमेझॉन, तर दुसऱ्या संघाचे नाव सुपर वुमेन असे आहे. या स्पर्धेत एकूण तीन सामने खेळले जाणार आहेत. पहिला सामना 8 मार्च रोजी खेळला गेला. दुसरा सामना 9 मार्च रोजी खेळला जाईल आणि तिसरा सामना 10 मार्च रोजी आयोजित केला गेला आहे. हे तिन्ही सामना रावलपिंडी स्टेडियममध्ये आयोजित केले गेले आहेत.
या लीगविषयी बोलताना महिला क्रिकेट संघाच्या प्रमुखे तानिया मलिक म्हणाल्या की, “मी खूप रोमांचित आणि उत्साहित आहे की, महिलांची लीगचे सामने होत आहेत. हे सामने आमच्या खेळाडूंना स्वतःची प्रतिभा सिद्ध करण्यासाठी आणि आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन कऱण्यासाठी उपयोगी पडेल. जेव्हा तुम्ही एखादी लीग विदेशी खेळाडूंसोबत खेळता, तेव्हा लोकल खेळाडूंना विदेशी खेळाडूंकडे असलेली शैली जाणून घेण्याची आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याची आणि स्वतःचे प्रदर्शन सुधारण्यासाठी फायदेशीर असते.”
महिला पीएसएल लीगचे दोन्ही संघ
ऍमेझऑन संघ: बिस्माह मरूफ, आलिया रियाज, अनम अमीन, अरीशा नूर, एयमन फातिमा, फातिमा खान, फातिमा सना, गुलाम फातिमा, गुल फिरोजा, कायनात इम्तियाज, लॉरा डेलानी, लॉरेन विनफील्ड-हिल, मैया बाउचर, नाशरा सुंधु, सदफ़ शमास, टैमी ब्यूमोंट, टेस फ्लिंटॉफ, उम्म-ए-हानी.
सुपर वूमेन संघ: निदा दार, ऐमेन अनवर, चमारी अथापथु, दानी व्याट, इरम जावेद, जहांआरा आलम, लौरा वोल्वार्ड्ट, लिया ताहुहु, मुनीबा अली, नतालिया परवेज, ओमिमा सोहेल, सादिया इकबाल, शवाल जुल्फिकार, सिदरा अमीन, सिदरा नवाज, सैयदा अरूब शाह, सैयदा मासूमा जहरा और तुबा हसन.
(Like India, Women’s T20 League started in Pakistan too)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंतप्रधान मोदींसह जेव्हा हजारो भारतीय एकाचवेळी म्हणतात देशाचे राष्ट्रगीत, पाहा अहमदाबाद स्टेडियमवरील अत्यंत सुंदर दृश्य
पंतप्रधान मोदी-अल्बानीज यांनी वाढवली भारत-ऑस्ट्रेलियातील चौथ्या कसोटीची शोभा, कर्णधारांना दिल्या खास टोप्या