अर्जेंटिनाचा स्टार फुलबॉलपटू लिओनेल मेस्सीने रविवारी (०८ ऑगस्ट) २१ वर्षांनंतर त्याच्या स्पॅनिश क्लब बार्सिलोनाला निरोप दिला आहे. बार्सिलोनाचा खेळाडू म्हणून शेवटच्या पत्रकार परिषदेत सहभागी होताना तो भावुक झाला होता. या स्टार फुटबॉलपटूला आज संपूर्ण जगाने रडताना पाहिले आहे. खरे तर, आपल्या निरोपाच्या वेळी प्रतिक्रिया देताना लिओनेल मेस्सी भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले.
बार्सिलोनाचा खेळाडू म्हणून आपल्या शेवटच्या पत्रकार परिषदेत लिओनेल मेस्सी खूपच कमी बोलला. त्याहून जास्त त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते. मेस्सीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, २१ वर्षांनंतर तो आपल्या तीन कॅटलन अर्जेंटिना मुलांसह परत जात आहे.
मेस्सी पुढे म्हणाला की, “इतकी वर्षे गेल्यानंतर म्हणजे जवळजवळ माझे संपूर्ण आयुष्य बार्सिलोनासोबत घालवल्यानंतर माझ्यासाठी हा क्लब सोडणे खूप कठीण आहे. आम्ही या शहरात राहिलो आहोत आणि हे आमचे घर आहे. प्रत्येक गोष्टीसाठी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आभारी आहे. क्लबमध्ये आगमनाच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत, मी माझे सर्वस्व क्लबला दिले आहे. मी निरोप घेण्याचा कधीही विचार केला नाही.”
Greatest Applause
Of
All
Time pic.twitter.com/YoJt8nkTZc— FC Barcelona (@FCBarcelona) August 8, 2021
मेस्सी म्हणाला की, “स्पॅनिश लीगच्या आर्थिक नियमांमुळे क्लबसोबत नवीन करार करणे अशक्य असल्याचे ऐकून मला वाईट वाटले. मला विश्वास आहे की, मी सदैव माझ्या घरासारख्या असलेल्या क्लबसोबत राहीन.”
त्याचबरोबर आपल्या शेवटच्या पत्रकार परिषदेत मेस्सीने पीएसजीमध्ये जाण्याच्या बातम्यांना अफवा असल्याचे सांगितले. एका प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला की, “पुढच्या हंगामात मी कुठे खेळणार, याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. मी अजून काहीच ठरवलेले नाही.”
मेस्सीने बार्सिलोनासाठी ६७२ गोल केले
अर्जेंटिनाचा स्ट्रायकर लिओनेल मेस्सीने २००४ मध्ये बार्सिलोनासह आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याने बार्सिलोनासाठी ७७८ सामन्यांमध्ये ६७२ गोल केले आहेत. मेस्सीने २१ वर्षांच्या कारकिर्दीत बार्सिलोना क्लबला एकूण ३४ विजेतेपद जिंकून दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
बिडीच्या पॅकेटवर झळकला मेस्सी, तर नेटकऱ्यांकडून आल्या ‘अशा’ प्रतिक्रिया