fbpx
Wednesday, January 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएलमधील आजपर्यंतचे ए टू झेड विक्रम वाचा एका क्लिकवर

List of big records in ipl

September 19, 2020
in क्रिकेट, IPL, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ IPL

Photo Courtesy: Twitter/ IPL


कोरोना व्हायरस या साथीच्या रोगादरम्यान इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) यूएई येथे होणार आहे. यामुळे जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य असेल. पुन्हा एकदा एमएस धोनीची शांत वृत्ती, विराट कोहलीची आक्रमकता यावर प्रत्येकाचे लक्ष लागलेले असेल. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होईल. कोव्हिड-19 च्या वाढत्या घटनांमुळे यंदा स्टेडियममध्ये प्रेक्षक नसतील.

आयपीएलच्या प्रत्येक हंगामात विक्रम होतात आणि ते तुटतातही. यावर्षीही आपण काही नवीन विक्रम होईल याची अपेक्षा करू. आयपीएलमधील अशेच काही विक्रम खाली दिले आहेत, ज्यांची खूप काळ चर्चा झाली आहे.

सर्वात मोठी धावसंख्या:

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदविला असून 2013 मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध ५ बाद 263 धावा आणि 2016 मध्ये गुजरात लॉयन्सविरुध्द ३ बाद 248 धावा केल्या होत्या. 2010 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जने ५ बाद 246 धावा केल्या होत्या.

सर्वात कमी धावसंख्या:

आयपीएलमधील सर्वात कमी धावा करण्याचा विक्रमही आरसीबीच्याच नावावर आहे. आरसीबी संघ 2017 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 49 धावांवर बाद झाला होता. दुसर्‍या क्रमांकावर राजस्थान रॉयल्स हा संघ आहे. या संघाने 2009 मध्ये आरसीबी विरुद्ध फक्त 58 धावा केल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली डेअरडेव्हिल्स हा संघ आहे. हा संघ 2017 मध्ये मुबंई इंडियन्स विरुद्ध 66 धावांवर बाद झाला होता.

मोठया फरकाने मिळवलेला विजय:

2017 मध्ये दिल्ली विरुद्ध झालेला सामना मुंबई इंडियन्सने १४६ धावांनी जिंकला होता. धावांच्या फरकाने मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे. 2016 मध्ये गुजरात लॉयन्सला १४४ धावांनी पराभूत करणाऱ्या केकेआर संघाचा दुसरा क्रमांक आहे.

सर्वाधिक अतिरिक्त धावाः

केकेआर संघाने सर्वाधिक अतिरिक्त धावा देण्याचा विक्रम 2008 मध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्ध केला होता. त्यांनी तब्बल28 अतिरिक्त धावा दिल्या होत्या. किंग्ज इलेव्हन पंजाबने 2011 मध्ये आरसीबीविरुद्ध 27 अतिरिक्त धावा दिल्या होत्या.

सर्वाधिक धावाः

आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा केल्या असून त्याने 12 हंगामात 5412 धावा केल्या आहेत. चेन्नईच्या सुरेश रैनाने 5368 आणि मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने 4898 धावा केल्या आहेत.

सर्वाधिक षटकार:

वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने आयपीएलमध्ये सर्वाधिक 326 षटकार ठोकले आहेत तर आरसीबीच्या एबी डिव्हिलियर्सने 357 आणि चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने 297 षटकार ठोकले आहेत.

सर्वाधिक वैयक्तिक धावा:

टी20 क्रिकेटचा स्टार फलंदाज ख्रिस गेलने 2013 मध्ये पुणे वॉरियर्स विरुद्ध 66 चेंडूत नाबाद 175 धावा केल्या होत्या. ही आयपीएल मधील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या आहे. स्पर्धेचे सर्वात वेगवान शतकदेखील गेलच्याच नावावर आहे. केकेआरचा फलंदाज ब्रेंडन मॅक्युलम (नाबाद 158) दुसऱ्या आणि आरसीबीचा फलंदाज डिव्हिलियर्स (नाबाद १३३) तिसर्‍या स्थानावर आहे.

सर्वाधिक शतकेः

गेलने आयपीएलमध्ये सर्वाधिक सहा शतके केली आहेत, कोहलीने पाच तर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने चार शतके केली आहेत.

सर्वात वेगवान अर्धशतकः

किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलने 2018 मध्ये दिल्ली कॅपिटलस विरूद्ध 14 चेंडूत 51 धावा केल्या, जे आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक आहे. केकेआरचे युसुफ पठाण आणि सुनील नारायण यांनी 2014 आणि 2017 मध्ये अनुक्रमे 15 चेंडूत अर्धशतके झळकावली.

सर्वाधिक बळी:

आयपीएलमधील 122 सामन्यात मुंबई संघाच्या लसिथ मलिंगाने 7.14 च्या इकॉनॉमी रेटने 170 बळी घेतले आहेत. दुसर्‍या क्रमांकावर दिल्ली संघाचा अमित मिश्रा (157) आहे आणि चेन्नई संघाचा हरभजन सिंग (150) तिसर्‍या क्रमांकावर आहे. मलिंगा आणि हरभजन यावेळी आयपीएल खेळत नाहीत.

सर्वोत्कृष्ट गोलंदाजीः

मुंबईच्या अल्झरी जोसेफने गेल्या वर्षी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 3.4 षटकात १२ धावा देऊन सहा बळी घेतले होते. सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचा विक्रम त्याच्याच नावावर.

सर्वाधिक हॅटट्रिकः

दिल्लीच्या अमित मिश्राने आयपीएलमध्ये 147 सामन्यात तीन वेळा हॅटट्रिक घेतल्या आहेत. मुंबई संघाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने दोन तर चेन्नईच्या सॅम करनने एक हॅटट्रिक घेतली आहे.

डावात 4 बळी:

केकेआरच्या सुनील नारायणने सहा वेळा चार बळी घेतले आहेत.

सर्वाधिक डॉट चेंडू :

हरभजन सिंगचे नाव या यादीमध्ये सर्वात वर आहे. त्याने 1249 डॉट चेंडू फेकले आहेत . दुसर्‍या क्रमांकावर लसिथ मलिंगा आहे. त्याने 1155 डॉट चेंडू फेकले आहेत.

सर्वाधिक निर्धाव षटके:

भारताचा माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमारने 119 सामन्यांमध्ये 14 षटके निर्धाव टाकली आहेत.


Previous Post

सीएसकेचे प्रशिक्षक म्हणतात, ‘या’ खेळाडूंवर असेल संघाची संपूर्ण जबाबदारी

Next Post

भारताकडून सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन केलेला गोलंदाज झाला बाप

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

आता तयारी इंग्लंड विरुद्ध दोन हात करण्याची! पाहा पुण्यासह आणखी कुठे आणि कधी होणार टीम इंडियाचे सामने

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@OdishaFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१ : तळातील ओदिशाने हैदराबादला बरोबरीत रोखले

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@cricketcomau
टॉप बातम्या

शानदार शुभमन…! स्टार्कच्या चेंडूला भिरकवले मैदानाबाहेर, पाहा व्हिडिओ

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

अबब! पुजाराने ऑस्ट्रेलियात खेळले आहे तब्बल ‘इतके’ चेंडू

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

नुसता विजय नाय तर थरारक विजय! भारतीय संघाच्या कामगिरीवर छत्रपती संभाजीराजेंकडून कौतुकाची थाप; म्हणाले

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

केव्हिन पीटरसनचे चक्क हिंदीत ट्विट, ‘या’ कारणासाठी दिला भारताला सावधगिरीचा इशारा  

January 19, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ ICC

भारताकडून सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन केलेला गोलंदाज झाला बाप

मयंती लॅंगर जरी आयपीएलमधून बाहेर गेली असेल तरी हे नवे चेहरे गाजवणार हंगाम

Photo Courtesy: Twitter/IPL

आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात अशी असेल रोहितची मुंबई इंडियन्स!

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.