fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

पाकिस्तान संघाला वनडेत धु- धु धुणारे ३ भारतीय क्रिकेटर्स

List Of Highest Individual Scores In India Pakistan ODI Match

भारत आणि पाकिस्तान संघातील कोणताही सामना नेहमी रोमांचक होत असतो. दोन्ही देशातील वाईट संबंधाचे पडसाद थोडेफार मैदानावरही दिसायला मिळतात. दोन्ही संघ जिंकण्यासाठी जिव तोड खेळ करत असतात. अशावेळी काही फलंदाज दबावात येऊन लवकर बाद होतात. तर काही सामना जिंकण्याच्या उद्देशाने मोठ्या धावांची खेळी करण्याचा प्रयत्न करत असतात.

या लेखात आपण भारत-पाकिस्तान वनडे सामन्यात सर्वाधिक धावांची खेळी करणाऱ्या फलंदाजांविषयी माहिती घेणार आहोत.List Of Highest Individual Scores In India Pakistan ODI Match

५. सौरव गांगुली

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने २५ जानेवारी २०००मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सामन्यात १४१ धावांची दमदार खेळी केली होती. गांगुलीने दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत १४४ चेंडूत १२ चौकार आण एका षटकारासह ही शतकी खेळी केली होती. भारताने तो सामना ४८ धावांनी जिंकला होता. सचिननेही पाकिस्तानविरुद्ध वनडेत १४१ धावांची खेळी केली आहे.

४. शोएब मलिक 

पाकिस्तानचा फलंदाज शोएब मलिकने २५ जुलै २००४मध्ये कोलंबो येथील भारताविरुद्धच्या आशिया चषक सामन्यात १४३ धावंची दमदार खेळी केली होती. यावेळी १२७ चेंडूत १८ चौकार आणि १ षटकार मारत त्याने हा कारनामा केला होता. हा सामना पाकिस्तानने ५९ धावांनी जिंकला होता. शिवाय शोएबचे भारताविरुद्धचे वनडे प्रदर्शन उल्लेखनीय होेते. त्याने आपल्या वनडे कारकिर्दीतील ४ शतके भारताविरुद्ध केली आहेत.

३. एमएस धोनी

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने २००५मध्ये विशाखापट्टनम येथील पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सामन्यात अफलातून १४८ धावांची खेळी केली होती. विशेष म्हणजे, ते धोनीचे वनडेतील पहिले शतक होते. या सामन्यात धोनीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १२३ चेंडूत १५ चौकार आणि ४ षटकार मारत हा कारनामा केला होता. त्याच्या दमदार खेळीमुळे भारताने तो सामना ५८ धावांनी खिशात घातला होता. गमतीची भाग हा आहे की, धोनीने त्याचे कसोटीती पहिले शतकही पाकिस्तानविरुद्धच केले होते आणि यावेळीही त्याने १४८ धावांच केल्या होत्या.

२. विराट कोहली

भारताचा कर्णधार विराट कोहलीने २०१२मध्ये ढाका येथील पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सामन्यात १८३ धावांची उल्लेखनीय खेळी केली होती. विराटने २२ चौकार आणि १ षटकार मारत १४८ चेंडूत हा कारनामा केला होता. भारताने तो सामना ६ विकेट्सने जिंकला होता. यासह विराट हा पाकिस्तानविरुद्ध कर्णधार म्हणून सर्वाधिक धावांची खेळी करणारा पहिलाच भारतीय कर्णदार ठरला.

१. सईद अनवर 

पाकिस्ताचा माजी क्रिकेटपटू सईद अनवर हा भारत-पाकिस्तान वनडे सामन्यात सर्वाधिक धावांची खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. १९९७मध्ये चेन्नईतील भारताविरुद्धच्या इंडिपेंडेंस चषकातील वनडे सामन्यात अनवरने १९४ धावांची दमदार खेळी केली होती. हा कारनामा त्याने १४६ चेंडूत २२ चौकार आणि ५ षटकार मारत केला होता.  विशेष म्हणजे, अनवरला सचिन तेंडुलकरने गोलंदाजी करत बाद केले होते. त्यावेळी सौरव गांगुलीने चेंडू झेलत अनवरला द्विशतचक करण्यापासून रोखले होते. पाकिस्तानने तो सामना ३५ धावांनी जिंकला होता.

ट्रेंडिंग लेख-

कसोटीत अर्ध्यातासात अर्धशतक करणारे ५ फलंदाज

जगातील सर्वात महागडे अंपायर; पगाराच्या रक्कम ऐकून व्हाल अवाक्

वनडेत वेगवान दीडशतकी खेळी करणारे ५ फलंदाज

You might also like