क्रिकेट खेळाचा सर्वात सुंदर प्रकार म्हणजे ‘कसोटी क्रिकेट’. कसोटी क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत शतक तर अनेक फलंदाजांनी केले आहे. परंतु, २०० धावा करणे हे प्रत्येक फलंदाज एक स्वप्न असतं. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त २०० धावा करण्याचा विक्रम ‘सर डॉन ब्रॅडमन यांनी केला आहे. ब्रॅडमन यांनी त्यांच्या कारकिर्दीत १२ वेळा २०० धावांचा आकडा पार केला आहे. तसेच कसोटी सामन्यात ‘बिली मर्डोक’ यांनी सर्वप्रथम २०० धावा केल्या होत्या. हल्लीच आपल्या कसोटी पदार्पणात डेवोन कॉनवेने २०० धावा केल्या. आपण नेहमीच एकट्या फलंदाच्या केलेल्या २०० धावांबद्दल बोलत असतो. परंतु, आज आपण सर्वाधिकवेळा २०० धावा कोणत्या संघांच्या फलंदाजांनी मारले ते ह्या लेखातून पाहूया.
ऑस्ट्रेलिया
आजवर सर्वात जास्त २०० धावांचा टप्पा कुठल्या संघाच्या फलंदाजांनी ओलांडला असेल तर तो ऑस्ट्रेलियाचा संघ आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाजांकडून ७५ वेळा २०० धावा करण्यात आल्या. ज्यामध्ये सर्वात जास्त सर डॉन ब्रॅडमन यांनी १२ वेळा २०० धावा केल्या. रिकी पोंटिंगने ६, ग्रेग चॅपल आणि मायकल क्लार्कने ४ वेळा २०० धावा केल्या. ह्या व्यतिरिक्त मार्क टेलर, मॅथ्यू हेडन, डेविड वार्नर, ब्रॅड हॉज, स्टीव वॉ, एडम गिलक्रिस्ट, मार्नस लाबुशेन, जेसन गिलेस्पी यांसारख्या अनेक फलंदाजांनीसुद्धा कसोटीत २०० धावा केल्या आहेत.
इंग्लंड
इंग्लंड संघाकडून कसोटी क्रिकेटमध्ये आता पर्यंत ६१ वेळा २०० धावा करण्यात आल्या आहेत. इंग्लंडकडून सर्वात जास्त २०० धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ऍलिस्टर कूक आणि जो रूट ह्या फलंदाजांचा समावेश आहे. ह्या दोघांनी इंग्लंडसाठी प्रत्येकी ५ वेळा २०० धावा केल्या आहेत.
भारत
या यादीत तिसऱ्या स्थानी भारतीय संघ आहे. भारतीय फलंदाजांकडून कसोटीत ५५ वेळा २०० धावा करण्यात आल्या. भारतीय संघाकडून सर्वात जास्त कसोटीत २०० धावा करणारा फलंदाज म्हणजे विराट कोहली आहे. कोहलीने आता पर्यंत ७ वेळा २०० धावा केल्या आहेत. त्यानंतर सचिन आणि सेहवाग यांनी ५-५ वेळा २०० धावा केल्या. तसेच, राहुल द्रविडनेही ५ तर सुनील गावस्कर यांनी ४ वेळा २०० धावा केल्या आहेत.
वेस्ट इंडीज
चौथ्या क्रमांकावर वेस्ट इंडीजचा संघ आहे. वेस्ट इंडीज फलंदाजांकडून एकूण ५३ वेळा २०० धावा मारण्यात आल्या आहेत. वेस्ट इंडीजकडून सर्वाधिकवेळा २०० धावा ब्रायन लाराने केल्या आहेत. लाराने आपल्या कसोटी कारकिर्दीत ९ वेळा २०० धावांचा टप्पा ओलांडला आहे.
पाकिस्तान
पाचव्या स्थानावर असलेला पाकिस्तानचा संघ असून त्यांच्या फलंदाजांनी आजवर कसोटीत ४४ वेळा २०० धावा केल्या आहेत. पाकिस्तान कडून २०० धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये जावेद मियाँदाद आणि यूनिस खान यांची नावे आहेत. या दोघांनीही प्रत्येकी ६ वेळा २०० धावा करण्याचा विक्रम केला आहे.
श्रीलंका
श्रीलंका संघ ह्या यादीत सहाव्या स्थानावर आहे. श्रीलंका संघाकडून ३६ वेळा २०० धावा करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून सर्वात जास्त २०० धावा करणारा फलंदाज म्हणजे कुमार संगकारा. संगकाराने त्याच्या कारकिर्दीत तब्बल ११ वेळा २०० धावा केल्या आहेत. ब्रॅडमन यांच्यानंतर सर्वाधिकवेळा कसोटीत द्विशतके करण्याचा विक्रम संगकाराच्या नावावर आहे.
न्यूझीलंड
कसोटी २९ वेळा २०० धावाकरून न्यूझीलंड संघाने सातवे स्थान कायम केले आहे. त्यांच्या फलंदाजांनी आजवर २९ वेळा २०० धावांचा टप्पा पार केला. सध्या त्यांचा संघातील डेवोन कॉनवेने पदार्पणातच २०० धावा करून विक्रम केला. न्यूझीलंड संघाचा तडाखेबाज फलंदाज ब्रेंडन मॅक्यूलम आणि सध्याचा कर्णधार केन विलियम्सन यांनी सर्वाधिक ४ वेळा २०० धावा केल्या आहेत.
दक्षिण आफ्रिका
दक्षिण आफ्रिका फलंदाजांनी आजपर्यंत २९ वेळा कसोटीत २०० धावा केल्या आहेत. त्यामध्ये माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने सर्वाधिक ५ वेळा २०० धावांचा विक्रम केला. दक्षिण आफ्रिका संघाकडून ग्रॅमी स्मिथने फक्त हा कारनामा आपल्या संघासाठी केला आणि अजून पर्यंत हा विक्रम तसाच आहे.
बांगलादेश
नवव्या पायदानावर उभा असलेला संघ म्हणजे बांगलादेशचा संघ. बांगलादेश फलंदाजांनी आजवर ५ वेळा २०० धावा केल्या आहेत. बांगलादेशकडून मुशफिकुर रहीमने संघासाठी ३ वेळा २०० धावा केल्या तर, शाकिब अल हसन आणि तमीम इकबालने कसोटी सामन्यात प्रत्येकी १ वेळा २०० धावा केल्या आहेत.
झिम्बावे
दहाव्या स्थानी असलेला संघ म्हणजे झिम्बावेचा संघ. आजवर त्यांच्या फलंदाजांनी ४ वेळा २०० धावा केल्या आहेत. झिम्बावे संघाकडून सर्वात जास्त २०० धावा अँडी फ्लॉवरने मारल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी अजिंक्यपद फायनलपूर्वी भारतासाठी धोक्याची घंटा, ‘हा’ घातक किवी गोलंदाज करणार पुनरागमन
रॉस टेलरला बाद करण्यासाठी मार्क वूडने दाखवले त्याच्यातील फुटबॉल कौशल्य, पाहा व्हिडिओ
अखेर बीसीसीआयला आली जाग! वर्षभरानंतर महिला क्रिकेटपटूंना मिळाली ‘त्या’ स्पर्धेची बक्षीस रक्कम