फलंदाजीस पोषक अशा शारजाह स्टेडियमवर शुक्रवारी (२२ सप्टेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (आरसीबी वि. सीएसके) यांच्यात थरारक सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने ६ बाद १५६ धावा फलकावर लावल्या. प्रत्युत्तरात सीएसकेलाही धमाकेदार सुरुवात मिळाली. परंतु हा सामना सुरू असताना स्टेडियमधील दर्शकांमध्ये बसलेल्या एका निरागस चिमुकलीने मात्र सर्वांचे लक्ष वेधले.
चेहऱ्यावर गोड अशी स्माईल आणि हातात काळ्या रंगाचा बोर्ड घेऊन ती मुलगी उभी होती. पण त्या बोर्डावर जे काही लिहिले गेले होते, ते पाहून कट्टर सीएसके समर्थकांनीही मने पिघळली असावीत. धोनी, कृपया विराटला आजचा सामना जिंकू दे, अशी विनंती त्या चिमुकलीने सीएसकेच्या कर्णधाराकडे केली होती. तिच्या या विनंतीवरुन ती विराट आणि आरसीबीची खूप मोठी चाहती असल्याचे हे स्पष्टपणे दिसते.
एका ट्विटर वापरकर्त्याने तिचा हा गोड असा फोटो ट्विटरवर पोस्ट केला असून त्याला पिक ऑफ द डे असे कॅप्शन दिले आहे. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या पसंतीस उतरतो आहे.
Pic of the Day#rcb Sharjah #viratkholi #ViratKohli #IPL2021 King Kohli #CSKvsRCB #Dhoni #PlayBold #WeAreChallengers #Thala #CSK #WhistlePodu pic.twitter.com/Cw7OIf3nmr
— Ayush Jain (@AYUSH_JAIN__) September 24, 2021
दरम्यान आरसीबीच्या डावाबाबत बोलायचे झाल्यास, सलामीवीर देवदत्त पडीक्कल आणि विराट कोहली यांनी संघाला अपेक्षित सुरुवात करुन दिली. सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत त्यांनी १३ व्या षटकांपर्यंत आपापले अर्धशतक पूर्ण केले. कोहलीच्या रुपात ड्वेन ब्रावोने संघाला पहिला धक्का दिला. ५३ धावांवर खेळत असलेल्या कोहलीला त्याने १३.२ षटकात रविंद्र जडेजाच्या हातून झेलबाद केले. त्यानंतर लगेचच एबी डिविलियर्स १२ धावा करुन शार्दुल ठाकूरची शिकार बनला. त्यापुढील चेंडूवर त्याने ७० धावांवर खेळत असलेल्या पडीक्कललाही बाद केले.
पुढे ग्लेन मॅक्सवेलव्यतिरिक्त कोणालाही दुहेरी धावसंख्या करता आली नाही. परिणामी बेंगलोरने २० षटकांनंतर १५६ धावा फलकावर लावल्या. चेन्नईकडून ड्वेन ब्रावोने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकूरने २ आणि दिपक चाहरने एका विकेटचे योगदान दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
देशाला अजून मिळाला नाही वनडे-कसोटीचा दर्जा, पण ‘त्याने’ जगप्रसिद्ध आयपीएल खेळत रचला इतिहास
Photo: गोड गुफ्तगू!! नाणेफेकीवेळी धोनी अन् कोहलीचा ‘ब्रोमान्स’ ठरला लक्षवेधी, चाहतेही फिदा
चेन्नईविरुद्ध कर्णधार विराटने दिली सिंगापूरच्या नव्या भिडूला संधी, वाचा आरसीबीच्या पदार्पणावीराबद्दल