---Advertisement---

‘मी सुरेश रैना आहे, शाहिद आफ्रिदी नाही’, रैनाने का उडवली पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची खिल्ली?

Suresh-Raina-And-Shahid-Afridi
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी विस्फोटक खेळाडू सुरेश रैना सध्या कतार येथे सुरू असलेल्या लीजेंड्स लीग क्रिकेट 2023 स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेत त्याने पुन्हा एकदा आपल्या बॅटमधून चाहत्यांचे मनोरंजन केले. लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत रैना इंडिया महाराजा संघाकडून खेळतो. या स्पर्धेतील 5व्या सामन्यात वर्ल्ड जायंट्सविरुद्ध खेळताना रैनाने 49 धावांची वादळी खेळी साकारली. मात्र, संघाला हा सामना जिंकण्यात यश आले नाही. हा सामना जायंट्सने 3 विकेट्सने नावावर केला. असे असले, तरीही रैनाने त्याच्या खेळीने आणि एका वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले.

सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना सुरेश रैना (Suresh Raina) याला पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्याला विचारण्यात आले की, “आज रात्री तुमच्या प्रदर्शनानंतर प्रत्येकाला वाटतंय की, तुम्ही पुन्हा आयपीएलमध्ये खेळले पाहिजे.” या प्रश्नावर रैनाने मजेशीर अंदाजात उत्तर दिले. तो म्हणाला की, “मी सुरेश रैना आहे, मी शाहिद आफ्रिदी नाही. मी निवृत्ती घेतली आहे.” खरं तर, शाहिद आफ्रिदी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अनेकदा संघात पुनरागमन केले होते.

ब्रेटलीच्या सामन्यातील सर्वाधिक विकेट्स
रैनाच्या अष्टपैलू प्रयत्नांनंतरही इंडिया महाराजा (India Maharajas) संघाला 3 विकेट्सने सामना गमवावा लागला. भारताकडून युसूफ पठाण याने दोन विकेट्स घेतल्या. रैना, प्रवीण तांबे, अशोक दिंडा आणि हरभजन सिंग यांच्या खात्यातही प्रत्येकी एक विकेट पडली. जायंट्सकडून ब्रेट लीग याने वर्ल्ड जायंट्स (World Giants) संघाकडून 18 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या.  ख्रिस मोफू आणि टिनो बेस्ट यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तसेच, माँटी पानेसर आणि समित पटेल यांच्या खात्यात प्रत्येकी एक विकेट आली.

इंडिया महाराजाचा तीन सामन्यातील दुसरा पराभव
इंडिया महाराजा संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 विकेट्स गमावत 136 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना वर्ल्ड जायंट्स संघाने 18.4 षटकात 7 विकेट्स गमावत 139 धावा केल्या आणि सामना जिंकला. इंडिया महाराजा संघाचा हा तीन सामन्यातील दुसरा पराभव होता. ख्रिस गेल याने जायं

जायंट्सकडून ख्रिस गेल याने 46 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 57 धावा चोपल्या. शेन वॉटसन याने 16 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 26 धावांचे आव्हानही दिले. (llc 2023 former indian cricketer suresh raina on shahid afridi read here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! IND vs AUS वनडे मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच माजी कर्णधाराची अचानक निवृत्ती
रोहितच्या अनुपस्थितीत कशी असू शकते टीम इंडिया? पहिल्या वनडे सामन्याविषयी सर्व माहिती एकाच क्लिकवर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---