दिल्ली । आज भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात आशिष नेहराने एक मोठा विक्रम केला. भारताकडून सर्वाधिक काळ क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत नेहरा चौथ्या स्थानी आला आहे.
आशिष नेहराचे आंतरराष्ट्रीय पदार्पण २४ फेब्रुवारी १९९९ साली झाले होते. त्यानंतर हा खेळाडू भारताकडून तब्बल १८ वर्ष आणि २५० दिवस क्रिकेट खेळला.
भारताकडून सर्वाधिक काळ क्रिकेट खेळण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने भारताकडून २४ वर्ष आणि १ दिवस क्रिकेट खेळले आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी मोहिंदर अमरनाथ (१९ वर्ष आणि ३१० दिवस ) तर तिसऱ्या स्थानी लाला अमरनाथ (१९वर्ष ) असे आहेत.
आज आंतरराष्ट्रीय पदार्पण करत असलेला श्रेयस अय्यर हा नेहराच्या पदार्पणाच्या वेळी केवळ ४ वर्ष आणि ८० दिवसांचा होता.
नेहरा आपला शेवटचा कसोटी सामना पाकिस्तान विरुद्ध २००४ मध्ये तर वनडे सामनाही पाकिस्तानविरुद्ध २०११च्या विश्वचषक उपांत्यफेरीत खेळला होता.